Udayanraje Bhosale, Satyajeet Tambe sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News : सत्यजित तांबेच्या गळ्याला शालीचा फास आवळत उदयनराजे म्हणाले, सगळ्यांनी असाच त्रास दिला ना...

Udayanraje Bhosale सत्यजित तांबे यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर खासदार उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली.

Umesh Bambare-Patil

Satara News : नाशिक पदवीधर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे Satyajit Tambe यांनी आज खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांची शासकीय विश्रामगृहात सदिच्छा भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी आमदार तांबे यांच्या गळ्यात शाल घालताना शालीचा एक कोपरा तांबे यांच्या गळ्याभोवती आवळत मिश्किलपणे पदवीधरच्या निवडणुकीत असाच सगळ्यांनी फास दिला ना...अशी टिप्पणी केली. यावर एकच हश्या पिकला.

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषद आमदार सत्यजीत तांबे हे सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. कोल्हापूरला जाताना तांबे यांनी विलासपूर येथील उद्योजक व खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक संग्राम बर्गे यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर सत्यजित तांबे यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर खासदार उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली.

उदयनराजे यांचे सर्वपक्षीय संबंध हे सर्वश्रुत आहे. नवनिर्वाचित आमदार तांबे यांचा उदयनराजे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. मात्र, शाल घालताना उदयनराजे यांनी शालीचा एक कोपरा तांबे यांच्या गळ्याभोवती आवळत मिश्किलपणे पदवीधरच्या निवडणुकीत असाच सगळ्यांनी त्रास दिला ना अशी टिप्पणी केली.

उदयनराजे यांच्या राजकीय टोलेबाजीला सत्यजित तांबे यांनी तितक्याच उत्स्फूर्तपणे हस्तांदोलन करत दाद दिली. त्यानंतर दाोन्ही नेत्यात विविध विषयावर दिलखुलास चर्चा झाली. उदयनराजे व तांबे यांच्या या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. यावेळी युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष संग्राम बर्गे, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, पंकज चव्हाण, माजी नगराध्यक्ष नासीर शेख आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT