Solapur, 04 April : बापूला अक्कल नाही, बापूनं मिटवलं नाही. बापूला कळलं नाही. मी उभा राहत होतो, तर निवडून येत होतो, बापूनं गप्प बसायला पाहिजे होते, असे दीपक साळुंखे म्हणत होते. पण, का माझ्यावर अन्याय करता? बरं म्हणत होतो शेवटची पाच वर्षे. मला 90 हजार मतं पडली आहेत आणि तुम्हाला 50 हजार मतं. आता निवडून कोण येणार? भांडताय काय? आता नरडं दाबू का या माणसाचं?, असे म्हणत माजी आमदार दीपक साळुंखे यांच्याकडे पाहत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी धक्कादायक विधान केले.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांची गाडी सुसाट सुटली होती. त्याच भाषणादरम्यान विधानसभा निवडणुकीत किस्सा शहाजी पाटील यांनी सांगितला. ते म्हणाले, जयकुमार गोरे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोघांनी माझ्यावर सर्वांत जास्त प्रेम केले. मला कधीही डावललं नाही. मला चालता येत नव्हतं, गुडघं दुखायचं. पण, बापू सीनियर आहेत, बापू तुम्ही बसा, आम्ही पाहतो, असे ते म्हणायचे.
माझं तुम्ही काय बी बरं वाईट करा. तुम्ही नाही केलं तरी वाईट करणारे सर्वजण स्टेजवर बसले आहेत. तुम्ही अजितबात काळजी करू नका. मस्त गेम करतात, माझा. मी कितीही बोंबलू द्यात. मी पडलो म्हणून तुम्ही अजिबात रडायचं नाही. मी बाजीगर आहे. हरलो तरी तेवढ्याचा दमाने उभा राहणार माणूस आहे. मला शूत्र कोणी नाही. डॉ. बाबासाहेब देशमुख (Babasaheb Deshmukh) मला मुलासारखे आहेत. काय म्हणून शत्रुत्व करावं. पोपटराव देशमुख यांच्याशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, आबासाहेबांच्या घरातील एकही कार्यक्रम मी चुकवला नाही. माझ्या अगोदर माझे वडिल आणि माझे चुलते चंद्रकांत आणि पोपट देशमुखांच्या लग्नात होते. त्याचे सर्व फोटो माझ्याकडे आहेत. आम्ही नातं जपलं आहे, असेही शहाजी पाटील यांनी स्पष्ट केले.
माजी आमदार पाटील म्हणाले, दीपक साळुंखे (Deepak Salunkhe ) आणि आमचं घर तर एकच आहे. मला पाडून दीपकआबा निवडून आला असता, तर मला लय राग आला असता. मलाही पाडलं आणि आबाही पाडला. मग रागवायचं कशाला. आबांनं लय बरोबरी केली आहे, तुलाही पाडतो आणि मीही पडतो, दोघंही आम्ही दाणदिशी आदळलो. आम्हाला अजूनही विधानसभा निवडणुकतील चूक सापडलेली नाही.
शेवटची पाच वर्षे मला द्या, असं मी म्हणत होतो. मला तुम्ही पाडून रिकामं केलं. आता एकदा निवडून येत नाही, तोपर्यंत अजिबात थांबत नाही. तुम्ही मला काय करायचं ते करा. माझं डिपॉझिट जरी जप्त केलं आणि डॉ. बाबासाहेब देशमुख यांना निवडून आणलं, तर मी उभाच राहणार आहे. कंटाळून कंटाळून मला एकदा तुम्हाला निवडून द्यायचं लागेल, असेही शहाजी पाटील यांनी नमूद केले.
शहाजीबापूंनी घोषित केला विधानसभेचा आगामी उमेदवार
सत्कार समारंभ सोप्यात नाही. सगळ्या गड्यांनी ओळखा. मला जर तुम्ही ताप दिला, तर उद्या माझा उमेदवार बाळासाहेब एरंडेच असतो. मी जरा कमी पडतो, पण बाळासाहेब एरंडे यांना उभा करून एकदा तुम्हाला दाखवतोच. किती घ्यायचं ते घ्या, पण एरंडे यांना निवडून द्या. प्रचारप्रमुख शहाजी पाटील होऊन जाऊ द्या. पण, यावर तातडीने खुलासा करत शहाजीबापू पाटील ‘बाबासाहेब चेष्टने बोलतो, सोन्याची खाण घावलेला माणूस मातीच्या खाण कशाला शोधेल. एरंडे साहेबांचं ओके चाललं आहे,’ असे स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.