Maharashtra MLC Elections : आमदार शहाजीबापू पाटील विधान परिषद मतदानासाठी लवकच विधानभवनात जाणार

MLA Shahaji Patil : आमदार शहाजी पाटील हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दोन उमेदवार रिंगणात आहेत.
MLA Shahaji Patil
MLA Shahaji Patil Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 12 July : शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांची तब्येत ठणठणीत असून ते रात्री आमदार निवासात मुक्कामाला होते. ते थोड्याच वेळात विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी विधीमंडळात दाखल होतील, अशी माहिती आमदार शहाजी पाटील यांचे निकटवर्तीय रफीक नदाफ यांनी दिली.

विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election)11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यात महायुतीच्या नऊ, तर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) तीन उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. दोन्ही बाजूच्या उमेदवारांसाठी एक एक मत महत्वाचे आहे, त्यामुळे सर्व आमदारांचे मतदान होण्यासाठी महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून प्रयत्न होताना दिसत आहेत.

सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) हे काही दिवसांपूर्वी मुंबईतील रुग्णालयात ॲडमिट होते. मात्र, नुकतेच ते बरे होऊन सांगोला तालुक्यातील आपल्या चिकमहूद या गावी आले होते. विधान परिषद निवडणुकीसाठी ते गुरुवारीच मुंबईला आले आहेत. ते सध्या मुंबईतील आमदार निवास स्थानात मुक्कामी होते.

आमदार शहाजी पाटील यांचे विश्वासू सहकारी रफीक नदाफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार शहाजी पाटील हे थोड्याच वेळात विधान परिषदेच्या मतदानासाठी विधीमंडळात जाणार आहेत. त्यांच्या तब्येतीबाबत सुरू असलेली चर्चा ही निरर्थक आहे. बापूंची तब्येत ठणठणीत आहेत, असेही नदाफ यांनी स्पष्ट केले.

आमदार शहाजी पाटील यांचे विश्वासू सहकारी रफीक नदाफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार शहाजी पाटील हे थोड्याच वेळात विधान परिषदेच्या मतदानासाठी विधीमंडळात जाणार आहेत. त्यांच्या तब्येतीबाबत सुरू असलेली चर्चा ही निरर्थक आहे. बापूंची तब्येत ठणठणीत आहेत, असेही नदाफ यांनी स्पष्ट केले.

MLA Shahaji Patil
Vidhan Parishad Election 2024 : विधान परिषदेसाठी कोणाला मतदान करणार? बच्चू कडूंनी जाहीरपणे सांगितले..

आमदार शहाजी पाटील हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दोन उमेदवार रिंगणात आहेत. त्यांनी माजी खासदार कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांना उमेदवारी दिली आहे. हे दोन्ही उमेदवार निवडून येण्यासाठी शिवसेनेला 46 आमदारांची गरज भासणार आहे.

एकनाथ शिंदे गटाकडे सध्या 37 आमदार आहेत. याशिवाय काही अपक्षही सोबत आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदे यांना आणखी नऊ आमदारांची गरज भासणार आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे.

Edited By : Vijay Dudhale

MLA Shahaji Patil
Vidhan Parishad Election विधान परिषदेच्या मतदानाबाबत काँग्रेसच्या हिरामण खोसकरांनी भूमिका केली स्पष्ट....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com