Shahuwadi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gram Panchayat Election : कोल्हापुरातील शाहूवाडी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार, कारण..

संभाजी थोरात

Shahuwadi : प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आज ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडले. कोल्हापूरपुरातील ग्रामपंचायतींसाठीही मतदान झाले. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील एकूण 432 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान उत्साहात झाले. कोल्हापुरातील शाहूवाडीही ग्रामपंचायत वगळता इतर सगळीकडे अत्यंत चुरशीने मतदान पार पडले. मात्र शाहूवाडीतील मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसत होता.

कोल्हापूरातील शाहूवाडीच्या मतदारांनी, स्थानिक ग्रामस्थांनी शाहूवाडीचे नगरपंचायत करावी, या मागणीसाठी आजच्या मतदानावर बहिष्कार घातला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी ही मोठी ग्रामपंचायत आहे.शाहूवाडी हे तालुक्याचं गाव आहे. 2013 सालच्या सरकारच्या निर्णयानुसार तालुक्यातील ग्रामपंचायत विसर्जित करून, नगरपंचायत करायलाल हवी होती. मात्र अनेक वर्षांची मागणी असूनही शाहूवाडी ग्रामपंचायतीची नगरपंचायत अजूनही करण्यात आली नाही.

आता गावाचा विस्तार वाढत चालल्याने येथील ग्रामस्थांनी नगरपंचायत व्हावी, अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी शाहूवाडीच्या ग्रामस्थांनी गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा केला आहे, मात्र, सरकारकडून या मागणीस सकारात्मक अजूनही मिळालेले नाही. याची प्रतिक्रिया म्हणून शाहूवाडी ग्रामस्थांनी आजच्या मतदानावर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे निवडणूक असूनही, मतदानाचा दिवस असूनही, गावात शुकशुकाट आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT