Sudhir Mungantivar : बावनकुळे म्हणाले, फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, मुनगंटीवारांचे वेगळेच...

Sudhir Mungantivar : मुख्यमंत्री पदाबाबत मुनगंटीवारांचे विधान..
Sudhir Mungantivar
Sudhir MungantivarSarkarnama
Published on
Updated on

Sudhir Mungantivar : राज्याच्या राजकारणात आता मुख्यमंत्रीपदावरून वक्तव्ये होताना दिसत आहे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी, "मी प्रदेश अध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेच पाहिजेत, अस विधान केले होते. यावर शिंदे गटाचे नेते व मंत्री शंभुराज देसाई यांनी, "कुणीही शिंदे गट आणि भाजपात मतभेद निर्माण करू नये," असे म्हंटले होते. भाजप आणि शिंदे गटात असे खटके उडत असताना, राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वेगळेच विधान केले आहे.

Sudhir Mungantivar
Gram Panchayat Election : मुंडे भगनींनी नाही बजावला मतदानाचा हक्क...

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, एकीकडे शिंदे साहेबांचा 'एस' आहे. दुसरीकडे फडणवीसांचा 'एफ' आहे. शिंदेचा एस आणि फडणवीसांचा एफ हे तर सुपरफास्ट आहे. यासोबतच एकनाथजींचा 'इ' हा इकोनॉमीसाठी वापरता येईल आणि देवेंद्रजींचा 'डी' हा डेव्हलेपमेंटसाठी वापरता येईल. सुपरफास्ट इकोनॉमीकली डेव्हलेपमेंट असं नेतृत्व पुन्हा आपल्याला किती वर्षांनी लाभेल, याचा अंदाजही करता येणार नाही, म्हणून सर्वात मोठी सुवर्णसंधी आपल्याकडे आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.

Sudhir Mungantivar
'' भाजपकडून लवकरच शिंदेंचा 'राजकीय' गेम''; राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा

मुनगंटीवार पुढे म्हणाले, "आम्ही भगवान टेकडी गणेशाकडे पार्थना करतो की, एकनाथ शिंदेंना जितके दिवस मुख्यमंत्री राहायची इच्छा असेल, तितके दिवस ईश्वराने त्यांना आशिर्वाद द्यावा," या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री पदाबाबत भाजपनेतेकडून होणाऱ्या वक्तव्यांमुळे चर्चांना उधान आले आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत नेमकं आताच विधाने करण्याचे कारण काय? याचा न्यायालयात असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची किनार का? इत्यादी प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com