Shambhuraj Desai, udyanraje Bhosle
Shambhuraj Desai, udyanraje Bhosle  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shambhuraj Desai News : ‘महायुती’बद्दल मतदारांत ‘महाविकास’नेच विष पेरले; शंभूराज देसाईंचा आरोप

सरकारनामा ब्यूरो

अरुण गुरव

Patan News : लोकसभेच्या निवडणुकीत महायुती पूर्ण ताकदीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभी राहिली होती. परंतु, चारशे पारचा अपेक्षित टप्पा महायुतीस गाठता आला नाही. देशात एक वेगळे समीकरण तयार झाले आणि महायुतीबद्दल मतदारांच्या मनात विष पेरण्याचे काम महाविकास आघाडीने केल्याचा आरोप राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केला.

दौलत नगर ( ता. पाटण) येथे सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांच्या विजयाबद्दल आयोजित केलेल्या आभार मेळाव्यात शंभूराज देसाई बोलत होते. (Shambhuraj Desai News)

मंत्री देसाई म्हणाले, सातारा लोकसभेची निवडणूक अटीतटीची झाली. खासदार उदयनराजे भोसले एक लाखांपेक्षा जास्त मतदान घेतील, अशी परिस्थिती होती. त्यानंतर देशात वेगळे समीकरण तयार झाले. महायुतीबद्दल मतदारांंत गैरसमज पसरवले गेले आणि लोकांच्या मनात विष पेरण्याचे काम महाविकास आघाडीने केले.

घटना बदलण्याचा विचार सरकारने केला नाही. याला मतदार बळी पडले. पाटण विधानसभा मतदारसंघात अपेक्षित मताधिक्य या निवडणुकीत देवू शकलो नाही. आम्ही कमी पडलो हे सत्य नाकारून चालणार नाही. महायुती मजबूत आहे. मतदाराचा गैरसमज काढायला कमी वेळ मिळाला. सामंजस्य भूमिका घेणारा खासदार म्हणून उदयनराजे भोसले यांच्या रूपाने नेता जिल्ह्याला लाभला आहे. लोकसभा निवडणुकीत चारशे पारचा टप्पा पार करता आला नाही. यातील त्रुटी व गैरसमज दूर करून विधानसभेच्या तयारीला लागू या, असेही शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी स्पष्ट केले.

उदयनराजे भोसले म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पाटण तालुक्याचा सर्वांगिण विकासासाठी योगदान दिले. ते नसते तर काय झाले असते. त्याच्या पश्चात त्यांचा वारसा त्यांचे नातू राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई समर्थपणे चालवत आहेत. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यात विकास कामे मार्गी लावली. पाटण तालुक्याची परिस्थिती या अगोदर कशी होती आणि आता कशी आहे, याचा मतदारांनी विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

सातारा जिल्हा काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला होता. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पश्चात मंत्री देसाई यांना सन्मान मिळाला का, असा प्रश्न करुन आगामी पाटण विधानसभा निवडणुकीत मंत्री देसाई आमदार आणि नामदार झाले पाहिजेत. यादृष्टीने प्रत्येकाने खूणगाठ बांधून कामाला लागले पाहिजे.

त्यासोबतच विरोधासाठी विरोध करणे चुकीचे आहे. दिवंगत लोकनेते बाळासाहेब देसाई आणि वसंतदादा पाटील यांच्यामुळे कामे झाली. कामे करण्याची भावना त्यांच्यामध्ये होती तीच भावना मंत्री शंभूराज देसाई यांच्यात असल्याचे उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT