Pune Congress News : अरे, चाललंय काय पुण्यात; भाजपपाठोपाठ आता काँग्रेसचे कार्यकर्तेही भिडले !

Political News : काँग्रेस भवनसमोर लागलेल्या एक बॅनर वादाचा विषय ठरला आहे. या बॅनरमुळे काँग्रेसचे कार्यकर्ते भिडल्याचं समोर आलं आहे.
pune Congress
pune Congress Sarkarnama

Pune News : पर्वती विधानसभा मतदारसंघातील एका मठामध्ये भाजपमधील दोन गटातील कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं समोर आले. या गोष्टीवरून रान उठवत काँग्रेसने घटनास्थळावर जात भजन आणि प्रार्थना करत भाजपच्या कार्यकर्त्यांना सुबुद्धी द्यावी, असे आंदोलन केलं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेस कार्यकर्तेच भिडल्याचे चित्र पाहायला मिळाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आज पुणे दौऱ्यावरती आहेत. यांच्याकडून शनिवारी काँग्रेस भवन येथे पुणे लोकसभेत झालेल्या पराभवाची कारणमीमसा करण्यात येणार आहे. शहरातील कोणत्या बूथवरून काँग्रेसला चांगलं मतदान झालं आणि कुठे काँग्रेसचा (Congress) टक्का घसरला याचा उहापोह या बैठकीत करण्यात आला. (Pune Congress News )

त्यामुळे काँग्रेसच्या नेमक्या कोणत्या नेत्याने काम केलं आणि कोणते नेते फक्त सोबत असल्याचा दिखावा करत होते हे नाना पटोले समोर येणार आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना काहीतरी सकारात्मक बदल होतील, अशी अपेक्षा आहे.

अशातच शनिवारी काँग्रेस भवनसमोर लागलेल्या एक बॅनर वादाचा विषय ठरला आहे. या बॅनरमुळे काँग्रेसचे कार्यकर्ते भिडल्याचं समोर आलं आहे. तर काँग्रेसचा जुना कार्यकर्ता असलेले मधुकरराव धीवार यांनी हा बॅनर लावला होता.

त्या पोस्टरमध्ये आता तरी यात बदल होणार का? अशा आशयाखाली काही खुर्च्या दाखवून त्याच्यावरती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले बाळासाहेब शिवरकर (Balasaheb Shivarkar), मोहन जोशी (Mohan Joashi), रमेश बागवे, अभय छाजेड, वीरेंद्र किराड, दीप्ती चौधरी आणि कमल व्यवहारे यांची नावे लिहिण्यात आली आहेत. एक प्रकारे या पोस्टरमधून या मंडळींना हटवण्याची मागणीच या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती.

pune Congress
Sangli Bjp News : सांगलीतील पराभवावरुन भाजपचे चिंतन; कार्यकर्त्यांनी आवळला नाराजीचा सूर

काही काळापासून अशाच प्रकारची मागणी सातत्याने काँग्रेसच्या वर्तुळामध्ये सुरू असते. मात्र, पहिल्यांदाच उघडपणे अशा प्रकारे पोस्टरबाजी केल्याने या नेत्यांच्या कार्यकर्त्यांना ते रुचले नाही आणि त्यातूनच त्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचं बोललं जात आहे. प्रकरणात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असल्याचे देखील समोर आले आहे.

शनिवारी दुपारी काँग्रेस भवन येथे मुकेश मधुकर धिवार यांना काही कार्यकर्त्यांनी मारहाण केली. बंदोबस्तातील अधिकारी अंमलदार यांनी तात्काळ त्यातील एकास ताब्यात घेतले असून तक्रारदार यांचे तक्रारीवरून योग्य ती कारवाई करत आहोत, असे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी सांगितले.

दरम्यान, धिवार यांनी यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणाऱ्या बागुल यांची हकालपट्टी करा व काँग्रेस‌ वाचवा, असा फ्लेक्स दाखवला होता. आजही धिवार यांनी बागुल यांचा तोच फ्लेक्स त्यांनी आणला आहे, असे बागुल यांच्या कार्यकर्त्यांना वाटले. त्यामुळे धिवार यांच्यावर हल्ला केला, पण फ्लेक्स वेगळाच निघाला. हल्ला झाल्यानंतर फ्लेक्स काय आहे, हे कळाले अशी माहिती सूत्रांनी दिली.

pune Congress
Raosaheb Danve News : आता आम्हाला नागरिकांमध्ये जायची संधी भेटली; दानवेंनी स्पष्टच सांगितले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com