Sanjay Raut, Shambhuraj Desai sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News : शंभूराज देसाईंची संजय राऊतांवर टीका...म्हणाले, तो तर चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट

Umesh Bambare-Patil

Shambhuraj Desai News : संजय राऊत यांच्या विधानांवर आम्ही फुली मारली आहे. तो एसी चेंबरमध्ये बसून तथ्यहिन बोलत असतात. तो चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट असून त्याला आम्ही गांभीर्याने घेत नाही, असा टोला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राऊतांना लगावला.

सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांनी आज शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच शिंदे गट शिवसेनेच्या Shivsena मंत्र्यांवर व सरकारच्या वर्षपूर्तीबाबत केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर दिले.

संजय राऊतांवर टीका करताना शंभूराज देसाई म्हणाले, संजय राऊत यांच्या विधानांवर आम्ही फुली मारली आहे. आम्ही लोकांच्या राहणारे नेते आहोत. ते एसी चेंबरमध्ये बसून तथ्यहिन बोलत आहे. चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट असून त्याला आम्ही गांभीर्याने घेत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

त्यावर पत्रकारांनी मंत्री मंडळ विस्तारात जयकुमार गोरे यांचे नाव आहे का, असे विचारले असता शंभूराज देसाई म्हणाले, जयाभाऊंचे नाव मंत्रीमंडळाच्या यादीत असेल तर आम्हाला आनंदच वाटेल. तर जयकुमार गोरे म्हणाले, याबाबत याबाबत त्या पोपटाला विचारावे लागेल, असा टोला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT