Satara News : मंत्रीमंडळ विस्तारात साताऱ्यातील कोणाला संधी : शिवेंद्रराजे की जयकुमार गोरे

Devendra Fadanvis उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच पत्रकारांशी बोलताना जुलैमध्ये राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याचे सुतोवाच केले आहे.
Jaykumar Gore, Shivendraraje Bhosale
Jaykumar Gore, Shivendraraje Bhosalesarkarnama
Published on
Updated on

Satara News : राज्यमंत्री मंडळाचा विस्तार जुलैमध्ये होण्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे साताऱा जिल्ह्यातील कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता वाढली आहे. भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व माण,खटावचे आमदार जयकुमार गोरे हे दोघ मंत्रीपदाच्या रेसमध्ये आहेत.

सातारा जिल्ह्यातील पाटणचे आमदार शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांना शिंदे फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळालेले आहे. तसेच सातारा व ठाणे जिलह्याचे पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळालेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या Eknath Shinde जवळचे असल्याने व बाळासाहेब देसाईंचे नातू या नात्याने त्यांच्यावर या जबाबदाऱ्या दिल्या.

आता शिंदे, फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्ताराचे संकेत मिळत आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच पत्रकारांशी बोलताना जुलैमध्ये राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे या महिन्यात मंत्रीमंडळाच्या होणाऱ्या विस्तारात शिवसेना व भाजपच्या काही नवीन आमदारांना संधी मिळणार हे निश्चित आहे.

Jaykumar Gore, Shivendraraje Bhosale
Satara News : एफआरपीवरून राजू शेट्टींचा केंद्रावर निशाणा...म्हणाले, डोंगर पोखरून उंदराची पिल्ले...

त्यानुसार साताऱ्यातून भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव पहिल्यापासूनच आघाडीवर आहे. कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी शिवेंद्रसिंहराजेंना मंत्रीपदाची संधी देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे पहिले नाव शिवेंद्रसिंहराजेंचे असणार हे निश्चित आहे. पण त्यांना कोणते खाते मिळणार याची उत्सुकता आहे.

Jaykumar Gore, Shivendraraje Bhosale
Pune Girl Attack : शरद पवारांच्या हस्ते होणार लेशपाल आणि हर्षदचा सत्कार

याबरोबरच माण, खटावचे आमदार जयकुमार गोरे हेही देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असल्याने त्यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. दुष्काळी भागाला न्याय देण्यासाठी झटणारे नेते म्हणून जयकुमार गोरेंना संधी दिली जाऊ शकते. भाजपमधून दोघांची नावे पुढे येत असल्याने कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे.

तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शंभूराज देसाई हे कॅबिनेट मंत्री असल्याने कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांना मंत्रीपद देऊन त्यांना ताकद देण्याचे काम होऊ शकते. त्यामुळे नव्या मंत्रीमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळणारयाकडे आता सातारकरांचे लक्ष लागले आहे.

Jaykumar Gore, Shivendraraje Bhosale
Eknath Shinde Delhi Visit : शिंदे - फडणवीसांची विमानतळावर 'गुफ्तगू' आणि मुख्यमंत्री थेट दिल्लीला रवाना ; मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com