-राजेश पाटील
Shambhuraj Desai News : छोट्या छोट्या बाबीतून कार्यकर्त्यांना आनंद मिळवून देणारा नेता म्हणूनही पालकमंत्री शंभूराज देसाई यांची एक वेगळीच खासियत राहिली आहे.मंत्रीपदी निवडीनंतर अलीकडे काही वर्षांपासून विमान प्रवास वाढल्याने मंत्री देसाई सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांनाही आवर्जून निरोप देवून प्रवासात आपल्या सोबत घेत असल्याने नेत्यांसोबतच्या हवाई सफरीने कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित होतो आहे. या सफरींची सर्वत्र सध्या मोठीच चर्चा आहे.
सभा आणि बैठकांना कितीही गर्दी असली तरी सामान्यातील कार्यकर्त्यालाही जवळ बोलावून आपुलकीने आणि आस्थेने विचारपूस करण्याची राजकारणातील ही एक वेगळी खुबी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडेही आहे.अनेकदा त्याचे प्रत्यंतरही येते,नेत्याने आपली आठवण ठेवली म्हणून कार्यकर्त्यांची छाती आभिमान व आनंदाने फुगते. मंत्रीपदी निवड झाल्यापासून अलीकडे शंभूराज देसाई यांच्यावर कामाचा ताण
प्रचंड वाढला आहे.मात्र सभा,बैठका,दौरे अशा सकाळ पासून रात्री पर्यंतच्या या बिझी श्येड्युलमध्ये त्यांचा कार्यकर्ता मात्र कधीच बेदखल झालेला दिसत नाही.अडीअडचणी व प्रश्न घेवून त्यांना दौलतनगर,सातारा,मुंबई येथील निवासस्थानी आणि थेट मंत्रालयात भेटायला येणाऱ्या कार्यकर्त्यांचा सतत राबता असून प्रचंड व्यापातूनही त्यांना नेत्यांकडून वेळही मिळत आहे.
अलीकडे काही वर्षांपासून विमान आणि हेलिकॉप्टरमधून प्रवास वाढल्याने मंत्री देसाई एकटे प्रवास न करता सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांनाही आवर्जून निरोप देवून आपल्या सोबत घेत असल्याने नेत्यांसोबतच्या हवाई सफरीने कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित होतो आहे.पाटण तालुक्याबरोबरच संपूर्ण जिल्ह्यात अशा सफरींची सध्या मोठीच चर्चा आहे. आतापर्यंत अनेक कार्यकर्त्यांनी नेत्यांसोबत हवाई सफरीचा आनंद घेतला असून प्रवासात नेते एकटे असल्याने त्यांच्या सोबत 'मन की बात 'बोलता येत असल्याचेही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
" विमानाचा आवाज आला की आजही औत्सुक्याने आकाशाकडे नजर टाकणाऱ्या सर्वसामान्य माणसाला आपल्या नेत्यांसोबत हवाई प्रवासाचा आनंद मिळतो आहे ही खूप आनंदायी आणि अविस्मरणीय बाब आहे. अनेकजणांनी आतापर्यंत असा आनंद घेतला असून मीही त्यापैकी एक आहे."
-मनोज मोहिते (कार्यकर्ते)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.