Patan : शंभूराज देसाईंच्या मेळाव्यात 273 जणांना मिळाली नोकरी....

Shambhuraj Desai छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून शिवदौलत नोकरी महामेळाव्याचे आयोजन केले होते.
Shiv Daulat Job Fair Patan
Shiv Daulat Job Fair PatanSarkarnama
Published on
Updated on

Patan News : राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर-मरळी येथे शिवदौलत नोकरी महामेळावा आयोजित केला होता. या महामेळाव्यात नामांकित 52 कंपन्यांचा सहभाग होता. पाटण मतदारसंघातील सुमारे 690 युवक-युवतींनी या महामेळाव्यात सहभाग घेतला. त्यातील पात्र असलेल्या २७३ जणांना त्याच दिवशी थेट नामांकित कंपन्यांची शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे सुपूर्द करण्यात आली.

शंभूराज देसाई म्हणाले, पाटण हा डोंगरी व दुर्गम भागामध्ये वसलेला मतदारसंघ असून मतदारसंघामध्ये अनेक युवक व युवती या सुशिक्षित आहेत. सुशिक्षित युवक व युवतींना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, या दृष्टीने मतदारसंघामध्ये सातारा, पुणे, कोल्हापूर येथील अनेक नामांकित कंपन्यांना सहभागी करुन युवक व युवतींना नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न झाल्यास पात्रतेनुसार नोकरी मिळण्यास चांगली मदत होईल.

या गोष्टीचा विचार करुन मतदारसंघातील बेरोजगार युवक व युवतींना नोकरीची तसेच रोजगारांची संधी उपलब्ध होण्यासाठी या शिवदौलत नोकरी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या नोकरी महामेळाव्यामध्ये पुणे,सातारा व कोल्हापूर येथील तब्बल 52 नामांकीत कंपन्या सहभाग घेतला. कंपन्यांना आवश्यक असणा-या पदावर नावनोंदणी केलेल्या 690 युवक युवतींच्या मुलाखती घेतल्या.

Shiv Daulat Job Fair Patan
Patan : शिवजयंतीदिनी शंभूराज देसाई देणार युवकांना नोकरीची संधी; पाटणला महामेळावा

मुलाखती दिल्येल्या युवक-युवतींमधील पात्र असलेल्या 273 जणांना याच दिवशी नियुक्ती पत्र देण्यात आली. पाटण मतदारसंघामध्ये पहिल्यांदा आयोजित केलेल्या या शिवदौलत नोकरी महामेळावा यशस्वी झाला असून, मतदारसंघातील युवक व युवतींनी या नोकरी महामेळाव्याला चांगला प्रतिसाद दिला. या नोकरी महामेळाव्याच्या माध्यमातून मतदारसंघातील बेरोजगारीचा काही प्रमाणात प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. यापुढील काळात प्रतिवर्षी पाटण विधानसभा मतदारसंघात नोकरी महामेळाव्याचे आयोजन केले जाणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

Shiv Daulat Job Fair Patan
Satara : सुडबुद्धीने वागणाऱ्या अधिकाऱ्यांचा पोलखोल करणार : शशिकांत शिंदे संतापले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com