Shambhuraj Desai  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Patan : नुकसानीच्या पहाणीसाठी शंभूराज देसाई पोहोचले बांधावर; पंचनामे करण्याचे आदेश

आम्हाला आता सरकारनेच government मदत करावी government should help, अशी मागणी शेतकऱ्यांनी Farmers पालकमंत्री देसाई Shambhuraj Desai यांच्याकडे केली.

Umesh Bambare-Patil

सातारा : राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज थेट पाटण तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयाबीन, भुईमूग आणि भात या पिकांची पाऊसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. दरम्यान, नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करावेत, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

सातारा जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काढणीस आलेल्या खरिप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान कोरेगाव, फलटण, पाटण, जावली व महाबळेश्वर तालुक्यात झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला सरकारने दिले आहेत.

आज या नुकसानीची प्रत्यक्ष बांधावर जाऊन साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली. त्यांनी तारळे विभागात ही पहाणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवादही साधला. यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, तसेच महसूल व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनी नुकसान झालेली पिके शेतातून काढली असतील तर मदत मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला.

त्यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी झालेल्या नुकसानीचा पुरावा म्हणजे फोटो असल्याशिवाय मदत मिळणार नाही. यामुळे शेतकऱ्यांकडे दरम्यानच्या काळातील फोटो असेल तरच मदत मिळणार आहे. दरवेळीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने शेतातील पिके काढता आली नाहीत. यामुळे उभ्या पिकांना कोंब आल्यानं शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आम्हाला आता सरकारनेच मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी पालकमंत्री देसाई यांच्याकडे केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT