Karad : उद्धव ठाकरेंनी आमदारांवर गैरविश्वास का दाखवला... शंभूराज देसाईंचा सवाल

बाळासाहेब देसाईंचा Balasaheb Desais नातू grandson म्हणून शंभूराज देसाई Shambhuraj Desai हे लाल दिव्याच्या गाडीतुन फिरले पाहिजेत. यासाठी ठाकरे Udhav Thackeray यांनी मला राज्य सहकार परिषदेचे अध्यक्षपद दिले. त्यांच्याशी आमची निष्ठा आहे.
Udhav Thackeray, Shambhuraj Desai
Udhav Thackeray, Shambhuraj Desaisarkarnama
Published on
Updated on

कऱ्हाड : विधान परिषद मतदानावेळी आम्हा आमदारांना बोलावुन मतदान कोणाला करायचे हे सांगताना दरवेळीसारखे आमचे नेते एकनाथ शिंदे हे नव्हते, हे आम्हाला पटले नाही. त्यानंतर मतदानासाठी जाताना विधान परिषदेच्या आमदाराला आमच्यासोबत ठेवले होते. एवढा उद्धव ठाकरे यांनी आमदारांवर गैरविश्वास का दाखवला, असा सवाल करुन आम्ही ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांना निर्णय घ्यायला भाग पाडले, असे स्पष्टीकरण उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

मंत्री देसाई यांची कॅबिनेट मंत्रीपदासह ठाणे आणि सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा मुंबईकर रहिवासी मित्रमंडळातर्फे आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले, जयवंत शेलार, किशोर पाटकर, दमयंती आचरे, अशोक गावडे, आबासाहेब देसाई, प्रकाश देसाई, प्रदीप पाटील, चंद्रकांत चाळके, संतोष जाधव, जयवंत जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Udhav Thackeray, Shambhuraj Desai
पाटणकरांना धक्का; मोरगिरीत ६० वर्षांनी सत्तांतर, शंभूराज देसाई गटाची सत्ता

मंत्री देसाई म्हणाले, राज्यातील मोठा जिल्हा म्हणून परिचित असणारा ठाणे आणि स्वतःच्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला दिले आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाला ताठ मानेने मुंबईत राहता आले पाहिजे, कुणाची लाचारी पत्करली नाही पाहिजे. ही भूमिका बाळासाहेब देसाई यांची होती.

Udhav Thackeray, Shambhuraj Desai
उद्धव ठाकरेंचा 'धनुष्यबाण' गेला, आता 'मशाल'ही अडचणीत...

तीच भूमिका शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती. शिवसेना उभी करण्यासाठी बाळासाहेब देसाईंनी मोठे सहकार्य केले. बाळासाहेब देसाईंचा नातू म्हणून शंभूराज देसाई हे लाल दिव्याच्या गाडीतुन फिरले पाहिजेत. यासाठी ठाकरे यांनी मला राज्य सहकार परिषदेचे अध्यक्षपद दिले. त्यांच्याशी आमची निष्ठा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com