Shambhuraj Desai Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shambhuraj Desai News : '...तर विशाळगडाचा अनर्थ टाळता आला असता' शंभूराज देसाईंचं वक्तव्य अन् 'हा' इशाराही दिला!

हेमंत पवार

Shambhuraj Desai On Vidhansabha Election : 'विशाळगडाच्या परिसरात घडलेला प्रकार दुर्देवी आहे.अतिक्रमण विशाळगडावर होते आणि दगडफेक, जाळपोळ, मोडतोड तेथून चार किलोमीटर अलिकडे झाली. त्यामुळे अधिक सतर्कता घेतली असती तर कदाचित हा अनर्थ टाळता आला असता.'

'तेथील पालकमंत्र्यांनी प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले आहेत. तेथील सर्व प्रकरणाची माहिती घेवून दोषींना शोधून काढून कारवाई केली जाईल.', असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कराड येथे दिला.

तर मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे(Manoj Jarange) पाटील हे काय बोलले आहेत मी एकलेले नाही, मात्र आवश्यकता असल्यास मी त्यांची भेट घेईन, असेही यावेळी शंभुराज देसाई यांनी सांगितलं.  पालकमंत्री देसाई यांनी कराड येथील कोयना बॅंकेस भेट दिली. त्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पालकमंत्री शंभुराज देसाई(Shambhuraj Desai) म्हणाले, 'अतिक्रमण हटवले म्हणून त्याचे श्रेय कोणाला जाते असे नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संभाजीराजे छत्रपती यांची बैठक होणार होती की नाही याची मला माहिती नाही. मुख्यमंत्री सर्वांचा समन्वय घालुन काम करण्याचा प्रयत्न करतात. संभाजीराजे हे शाहु महाराज छत्रपतींचे वंशज आहेत. ते केव्हाही मुख्यमंत्र्यांशी भेटू शकतात. तशी आवश्यकता असेल तर मी संभाजीराजे यांच्याशी बोलुन मुख्यमंत्र्यांची भेट घालुन देईन.'

200+ साठी मायक्रोप्लॅनिंग -

शिवसेनेने 100 पक्ष निरीक्षक नेमले आहेत. त्यामुळे शिवसेना 100 जागा लढवणार का? या प्रश्नावर मंत्री देसाई म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्या पक्षाला शिस्त लावली आहे. शिवसेना पक्षाची वेगळी काम करण्याची पध्दत आहे. लोकसभा निवडणुकीत आमचा स्ट्रायकिंग रेट 47 आहे. आम्ही मायक्रोप्लॅनींग केल्याने लोकसभेला चांगले यश मिळाले आहे.

एका मतदारसंघासाठी आमचे दोन निरीक्षक असतात. त्यांच्याकडून सर्वांचा समन्वय साधला जात आहे. आम्ही लोकसभेनंतर विधानसभेच्या कामाला लागलो आहोत. जागा किती लढवायच्या हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मित्रपक्षाचे नेते ठरवतील. लवकरच त्यासंदर्भात बैठक होणार आहे. महायुतीचे दोनशे प्लस बहुमत येण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.  

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT