MVA Vs Mahayuti: मोठी बातमी! महाराष्ट्रात आणखी एका नव्या आघाडीची 'एन्ट्री', मविआ अन् महायुतीला फोडणार घाम?

Raju Shetti News : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी पुन्हा एकदा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अॅक्शन मोडवर आले आहेत. शेट्टी यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीला धक्का देण्यासाठी शेतकरी संघटनांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे.
Mahavikas Aghadi Vs Mahayuti
Mahavikas Aghadi Vs Mahayuti Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. भाजप, काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी आप आपल्या पातळीवर निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. लोकसभेतील दमदार कामगिरीनंतर महाविकास आघाडीचा जोश वाढला आहे.

तर अतिआत्मविश्वास नडलेली महायुती पुन्हा एकदा जोमाने कामाला लागली आहे. पण आता महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हींना टक्कर देण्यासाठी महाराष्ट्रात नव्या आघाडीची एन्ट्री झाली आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी(Raju Shetti) पुन्हा एकदा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अॅक्शन मोडवर आले आहेत.शेट्टी यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीला धक्का देण्यासाठी शेतकरी संघटनांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे.

याच पार्श्वभूमीवर शेट्टी आणि शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप यांनी पुण्यात गुरुवारी (ता.18)बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Mahavikas Aghadi Vs Mahayuti
Imtiaz Jalil News : हिंदुत्ववादी संघटनांच्या इशाऱ्यानंतर 'एमआयएम'चं एक पाऊल मागं; इम्तियाज जलील यांचा कोल्हापूर दौरा रद्द; आता...

महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्हीही शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम नसल्याची टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.याचवेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या नव्या आघाडीची घोषणा केली आहे.

वामनराव चटप यांच्याशी चर्चा केल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghtana) आणि शेतकरी संघटनांची परिवर्तन आघाडीची घोषणा केली आहे.

Mahavikas Aghadi Vs Mahayuti
Pooja Khedkar Case Update : 'केवळ निलंबन चालणार नाही, अशा लोकांकडून..' ; 'LBSNAA'च्या माजी प्रमुखांचं मोठं विधान!

शेट्टी काय म्हणाले...?

राजू शेट्टी यांनी यावेळी महाविकास आघाडी आणि महायुतीवर टीकेची झोड उठवली.ते म्हणाले,शेतीवर अवलंबून असलेला सर्वच घटक सध्या अडचणीत आणला आहे. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी कुटुंब शहराकडे स्थलांतरीत होत आहे.तसेच शेतकरी कुटुंबांची अवस्था वाईट आहे.त्यांचे प्रश्न सरकार सोडवताना दिसत नाही. त्यामुळे आम्ही शेतकरी संघटनांनी तरी किमान एकत्र यायला हवं म्हणून ही बैठक झाली.

चांगला पर्याय उपलब्ध करुन द्यायचा प्रयत्न आमचा सुरू आहे.महाराष्ट्र अस्वस्थ असताना खरंतर विरोधी पक्ष आक्रमक असला पाहिजे.जनसामान्यांचे प्रश्न घेऊन लढत राहणे हे विरोधी पक्षाचं काम आहे. दूधदर, कांदा ,ऊस,सोयाबीन, कापसाचा प्रश्न निर्माण झाला.पण विरोधी पक्ष काही बोलतच नाही असा आरोपही शेट्टी यांनी यावेळी केला.

Mahavikas Aghadi Vs Mahayuti
Uddhav Thackeray News : मोठी बातमी ! निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला पहिल्यांदाच दिलासा; दिला 'हा' महत्वाचा निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com