kolhapur News: 'संजय राऊत चेंबर मध्ये बसतो आणि बोलतो. पाच रुपयाची तरी मदत संजय राऊत यांनी एखाद्या पूरग्रस्ताला शेतकऱ्याला केली आहे का? त्यांनी दाखवावे. स्वतः काय करायचं नाही असं संजय राऊत याची भूमिका.ते ठाकरे यांच्यासोबत दौऱ्याला गेले. चार जिल्ह्याचा दौरा तीन तासात केला याला दौरा म्हणतात का? अशा शब्दात पर्यटन मंत्री शंभुराजे देसाई टोला लगावला. आज ते कोल्हापुरात बोलत होते.
दौरा करण्यासाठी गुडघाभर चिखलात जावं लागतं. संजय राऊतांनी कधी बांध बघितलेला नाही. त्याच्या पायाला शेतकऱ्याच्या बांधावरचा चिखल लागलेला नाही.त्याला बोलायला काय लागत नाही. कोणाला काय उपमा द्यायची याकडे आता कोणीही लक्ष देत नाही. त्याने काही जरी म्हटले तरी 2024 च्या निवडणुकीमध्ये त्याला मतदाराने चपराक दिली आहे. संजय राऊत जे बोलतात ते भंपकगिरी आहे, त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही, असे देसाई म्हणाले.
पूरग्रस्त भागात सॅनिटरी नॅपकिन मागणी संदर्भात बोलताना, मराठवाडा परिसरात महापुराची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला एका एका जिल्ह्यामध्ये जाण्याची सूचना दिली होती. आम्ही दुसऱ्या दिवशीपासून पूरग्रस्त भागाचे सलग दौरे केले आहेत. सर्वत्र पाहणी केली.
सर्व यंत्रणा सतर्क आहे. जे आपण महिलांचं सांगताय.आमच्या आरोग्यमंत्री स्वतः त्या भागात दोन दिवस होते. सर्व डीएचओ, वैद्यकीय अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक मदत लागेल ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत, तसे आदेश दिले आहेत, अशी माहिती देसाई यांनी दिली.
ओला दुष्काळाबाबत ते म्हणाले की आता आकडेवारी प्राप्त होत आहे. प्राथमिक माहितीनुसार 50 लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्र बाधित आहे. काही सुद्धा पीक शिल्लक राहिले नाही अशी परिस्थिती झाली आहे. पाऊस एवढा मोठा होता ज्यामध्ये कॅनॉल देखील तुटले. त्यामुळे अनेक शेतांमध्ये कमरे एवढं पाणी झालं. सर्व महसूल यंत्रणा असो किंवा कृषी यंत्रणेला आम्ही प्रॅक्टिकल पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ज्या ठिकाणी जाता येत नाही त्या ठिकाणी ड्रोन पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. ओला दुष्काळ आणि सुका दुष्काळ या तांत्रिक बाबीत जाण्यापेक्षा, प्रत्यक्ष शेतकऱ्याला मदत देणं हे आमचे जबाबदारी आमचं कर्तव्य आहे. आम्ही एक आणि एक शेतकऱ्याला मदत देऊ. त्याला वंचित ठेवणार नाही, अशी ग्वाही देसाई यांनी दिली.
"अजित दादांच्या स्टेटमेंट कडे व्यवस्थित बघा, अजितदादा म्हटलं सरकारच्या तिजोरीवर जास्त बोजा आहे .तो रास्त आहे. वीजमाफीचे पैसे भरले, 45 हजार कोटी रुपये लाडक्या बहिणीसाठी दिले. हा अधिकचा बोजा पडला एवढेच दादा बोलले. याचा अर्थ आताच्या शेतकऱ्यांना मदत करणार नाही असं नाही.अधिकच कर्ज काढावे लागले तर ते काढू, कर्ज काढून फेडायची ताकद महाराष्ट्र सरकारमध्ये आहे. कर्ज काढण्यासंदर्भात रिझर्व बँकेने आणि केंद्र सरकारने जे लिमिट दिले आहे. त्या लिमिटच्या आतमध्ये आपण आहोत. त्यामुळे शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, असेही देसाई म्हणाले.
Q1. शंभुराजे देसाई यांनी संजय राऊतवर काय टीका केली?
👉 त्यांनी पुरग्रस्त भागातील वास्तवाकडे लक्ष न देता केवळ राजकारण केल्याचा आरोप केला.
Q2. शंभुराजे देसाई मराठवाड्यात कुठे गेले होते?
👉 ते पुरग्रस्त गावांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मराठवाड्यात गेले होते.
Q3. मराठवाड्यात पूरस्थिती कशी आहे?
👉 अनेक गावांत शेतजमिनी पाण्याखाली गेल्या असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
Q4. पुरग्रस्तांसाठी सरकारने कोणती मदत जाहीर केली आहे?
👉 सरकारने तातडीची मदत, पीकविमा आणि भरपाईचे आश्वासन दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.