अहमदनगर - राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांची अहमदनगर जिल्ह्यातील 274 बंधारे दुरुस्तीसाठी 52 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यात सर्वाधिक कामे पारनेर तालुक्यात होणार आहेत. पारनेर तालुक्यात 127 बंधारे दुरुस्तीसाठी 24 कोटी 53 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हे काम मंजुरीवरून शिवसेना ( Shivsena ) व राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. या निधी मंजुरी संदर्भात शंकरराव गडाख यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. Shankarrao Gadakh's answer to Nilesh Lanke by going to Parner
पारनेर तालुक्यातील पठारवाडी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी आमदार विजय औटी, शिवसेनेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रा. शशिकांत गाडे, काशिनाथ दाते, संदेश कार्ले, रामदास भोसले, किसनराव सुपेकर आदी उपस्थित होते.
शंकरराव गडाख म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यातील 3 ते 4 तालुके अतिशय दुष्काळी आहेत. यात तालुक्यांत पारनेर व नगर तालुक्याचा समावेश होतो. या तालुक्यांत फार पूर्वीच्या काळचे बंधारे आहेत. ते 10 ते 30 वर्षांपासून नादुरूस्त होते. काही बंधारे तर शिवकालीन व इंग्रजकालीन आहेत. हे बंधारे दुरुस्त करण्याची गरज होती. यासाठी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेच्या माध्यमातून एक नवीन योजना आपण आणली आहे.
ते पुढे म्हणाले की, 10 किंवा त्यापेक्षाही जास्त वर्षांपूर्वीचा तलाव, बंधारा दुरुस्त होणार आहे. मी अहमदनगर जिल्ह्याचा भूमीपूत्र असल्याने धडक कार्यक्रम हाती घेतला. 1100 तलाव, बंधाऱ्यांचे सर्वेक्षण केले. मला कोविडपूर्वीच सहा महिन्यांत बंधारे दुरुस्ती करायची होती. पण दुर्दैवाने कोविड आल्याने राज्य सरकारचे आर्थिक स्त्रोत मंदावले. त्यामुळे विकासकामे करता येत नव्हती. कोविड परिस्थिती अटोक्यात आल्यावर या कामाला वेग दिला. 1100 बंधाऱ्यांचे सर्वेक्षण केले. शासनाकडे बंधारे दुरूस्तीचा प्रस्ताव पाठविण्यात आला.
या बंधारे कामासाठी पारनेर तालुक्यातून शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांचा आग्रह होता. यात विजय औटी, काशिनाथ दाते म्हणत होते, आमच बंधाऱ्याच काम तेवढे करून द्या. तालुक्यातील लोकांच्या आग्रहा खातर नगर जिल्ह्यातील सर्वाधिक निधी पारनेर तालुक्याला दिला आहे. एकही बंधारा नादुरुस्त राहणार नाही. पुढील काळात अशी विधायक कामे होण्यासाठी विजय औटी, काशिनाथ दाते, सुपेकर यांच्या बरोबर हातात हात घेऊन काम करायचा प्रयत्न करावा, असे आवाहनही यावेळी मंत्री गडाख यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.