Sharad Lad claims his Pune Graduate Constituency candidature is confirmed with CM Devendra Fadnavis’s backing. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pune Graduate Constituency : "थेट CM फडणवीसांकडूनच उमेदवारी फिक्स झालीय" : चंद्रकांतदादांनी शब्द फिरवताच आमदार पुत्राने राष्ट्रवादीला दाखवली ताकद

Pune Graduate Constituency : शरद लाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आपली उमेदवारी निश्चित केल्याचा दावा केला आहे. मात्र राष्ट्रवादी मंत्री हसन मुश्रीफ आणि पक्ष भैय्या माने यांच्या उमेदवारीवर ठाम आहेत.

अजित झळके : सकाळ वृत्तसेवा

Pune Graduate Constituency : "पुणे पदवीधर हा भाजपचा पारंपारिक मतदारसंघ आहे. ही जागा भाजपच लढवेल आणि तुम्हीच उमेदवार असाल, असा शब्द स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मला दिला आहे. त्यामुळे महायुतीतील सर्व पक्षांनी वादापेक्षा यश कसे मिळेल, याचा विचार केला पाहिजे", असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसला देत क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी आपलीच उमेदवारी फिक्स आहे, असा दावा ‘सकाळ’शी बोलताना केला आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सध्या कलगीतुरा सुरु आहे. शरद लाड यांनी पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी डोळ्यासमोर ठेवून काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर नुकतेच पलूस येथील कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘पुणे पदवीधर मतदार संघाचे भाजपचे उमेदवार’, असा लाड यांचा परिचय करून दिला होता. त्याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर महायुतीत खळबळ उडाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री हसन मुश्रीफ यांनी भैय्या माने यांच्या नावाचा आग्रह धरलेला आहे. माने हे मागील अनेक महिन्यांपासून निवडणुकीची तयारीही करत आहेत. पण पाटील यांच्या घोषणेनंतर मुश्रीफ यांचाही तीळपापड झाला. त्यांनी थेट लाड यांचा पराभवाचे गणित देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडू, असा इशारा दिला. या गोंधळानंतर चंद्रकांत पाटील यांनीही वक्तव्यावरून सारवासारव करत ‘उमेदवारी जाहीर करण्याचा मला अधिकार नाही’, अशी भूमिका घेतली.

यानंतर याबाबत सकाळने थेट शरद लाड यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, "भैय्या माने किंवा आम्ही महायुतीचे घटक आहोत. उमेदवारी कुणाला मिलाली तरी आम्ही काम करायला तयार आहोत. वादविवाद टाळून काम करायला हवे. या प्रश्नात आताच वैयक्तिक वाद कशाला? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे हे निर्णय घेतील. तो सर्वांना मान्य करावा लागला. आमची भूमिका वेगळी नाही. आता महायुतीच्या जागा वाटपात जागा कुणाला जाते हे बघावे लागेल.

पण ही जागा भाजपची असणार आहे, पारंपारिक जागा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या प्रवेशाआधी स्पष्ट केले होते. मी उमेदवार असेल, असा शब्दही त्यांनी दिला आहे. आजच्या घडीला महायुतीत सर्वांनीच सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. भैय्या माने माझे मित्र, सहकारी आहेत. माझी तिसरी निवडणूक आहे. त्यामुळे मला अंदाज आहे. पाच वर्षे पाचही जिल्ह्यात आमचा संपर्क आहे. मी कामाच्या बळावर उमदवारी मागणार आहे. संघटनेची ताकद, महायुतीची ताकद मिळाली तर त्यात अडचण वाटत नाही, असेही शरद लाड यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT