Pune Police : 'मदत हवी तर एक कोटी मला अन् एक कोटी साहेबांना दे'; पुण्यात PSI चा गजब कारभार; 46 लाख घेताना सापडला रंगेहाथ

Pune Police Criminal Case : पुणे जिल्ह्यात एकीकडे वाढती गुन्हेगारी शासनाची डोकेदुखी ठरली असून पोलिसांचा याकडे कानाडोळा होत असल्याचा आरोप अनेकदा येथील राजकीय नेते आणि सर्वसमान्य जनता करत असते. पण आता येथे कुंपनच शेत खात असल्याचे समोर आले आहे.
Sub-Inspector Bribe Case
Sub-Inspector Bribe Casesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षकाला 46 लाखांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले.

  2. त्यांनी आरोपीला गुन्ह्यात मदत करण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांची मागणी केली होती.

  3. या घटनेमुळे पोलिस दलात आणि शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Pune News : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. येथे टोळ्यांमधील वैर आणि सूडनाट्य सह शुल्कक कारणावरून मारहाण तर दिवसा ढवळ्या हत्या केली जात आहे. यामुळे पोलिसांचा याकडे कानाडोळा होत असल्याचा आरोप अनेकदा येथील राजकीय नेते आणि सर्वसमान्य जनता करताना दिसत आहे. अशातच येथे कुंपनच शेत खात या मराठी म्हणीचा प्रत्यक्ष आला आहे. एका आरोपीला गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी एका फौजदाराने केल्याचे उघड झाले आहे. आता या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली असून त्या पोलिस उपनिरीक्षकाला ताब्यात घेतले आहे. त्याचे नाव प्रमोद रवींद्र चिंतामणी (वय -35) असे असून तो सध्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहे.

या प्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, आरोपीला गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याने दोन कोटी रुपयांची मागणी केली होती. तर पहिल्या हप्त्यापोटी 46 लाखांची लाच स्वीकारतानाच त्याला अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रविवारी (ता.2) ही कारवाई करत चिंतामणी याला रंगेहाथ पकडले.

‘एसीबी’चे सहाय्यक पोलिस आयुक्त दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक चिंतामणी हे मूळचे कर्जुले (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथील असून ते सध्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. तर तक्रादार व्यवसायाने वकील असून, त्यांच्या अशिलाविरुद्ध बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Sub-Inspector Bribe Case
Pune Police Action: निलेश घायवळ प्रकरणी मोठी अपडेट; 'पासपोर्ट'साठी व्हेरिफिकेशन केलेले पोलीस सापडले, चौकशीसाठी नोटीसही बजावली

त्या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांच्याकडे होता. या प्रकरणात अशिलाच्या वडिलांनाही अटक झाली असून, ते न्यायालयीन कोठडीत आहेत. अशिलाला मदत करण्यासाठी व त्याच्या वडिलांच्या जामीन अर्जावर सकारात्मक भूमिका घेण्यासाठी चिंतामणी यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली.

सुरुवातीला दोन लाख रुपयांची लाच मागितल्यानंतर तपासादरम्यान चिंतामणी यांनी अचानक दोन कोटींची मागणी केली. त्यातील एक कोटी स्वतःसाठी आणि उर्वरित एक कोटी त्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकासाठी असल्याचे त्यांनी तक्रारदार वकिलास सांगितले होते. याबाबत संबंधित वकिलाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

त्या तक्रारीप्रमाणे पुणे ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. त्यानंतर पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे आणि त्यांच्या पथकाने रविवारी सापळा रचला. त्यानुसार रास्ता पेठेत उंटाड्या मारुती मंदिरासमोर तक्रारदाराकडून 46 लाख 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना चिंतामणी यांना ताब्यात घेतले.

आरोपीकडून ही रक्कम जप्त केली असून, त्यात दीड लाखांच्या खऱ्या नोटा आणि 45 लाखांच्या बनावट नोटांचा समावेश होता. या कारवाईनंतर आरोपीच्या भोसरीतील दिघी रस्त्यावरील सोपान रेसिडेन्सी येथील घरावर आणि कार्यालयावर ‘एसीबी’ पथकाने झडती सुरू केली आहे.

Sub-Inspector Bribe Case
Pune Police Action: मोठी बातमी: पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे गुंड निलेश घायवळ प्रकरणी 'हे' महत्त्वाचे आदेश

FAQs :

1. प्रमोद चिंतामणी कोण आहेत?
ते पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक आहेत.

2. एसीबीने त्यांना कशासाठी पकडले?
त्यांनी गुन्ह्यातील आरोपीकडून मदतीच्या मोबदल्यात ४६ लाख रुपयांची लाच स्वीकारली होती.

3. त्यांनी किती रकमेची मागणी केली होती?
एकूण दोन कोटी रुपयांची मागणी केली होती, त्यातील पहिला हप्ता ४६ लाखांचा होता.

4. कारवाई कुठे झाली?
ही कारवाई पुण्यातील रास्ता पेठ परिसरात झाली.

5. या प्रकरणाचा पुढील तपास कोण करत आहे?
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) या प्रकरणाचा तपास करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com