Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar Karmala Tour : प्रकृती बिघडल्याने शरद पवार रुग्णालयात दाखल; करमाळा दौरा रद्द

NCP SP News : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना कफचा त्रास झाल्याने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. त्यामुळे त्यांचा करमाळा, बार्शी आणि बीड दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 02 November : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे (कफ) पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये ॲडमिट करण्यात आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. त्यामुळे त्यांचा आजचा नियोजित करमाळा दौरा रद्द झाला आहे. त्यांचा बार्शी आणि बीडमध्येही नियोजित दौरा होता. तो आता लांबणीवर गेला आहे.

शरद पवार यांनी रविवारी (ता. ०१ नोव्हेंबर) माढा तालुक्यातील तुळशी येथील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी तुळशी गावासाठी ५० लाख रुपयांची मदतही केली आहे. त्यानंतर ते आज करमाळा तालुक्यात दुष्काळी गावाच्या पाहणीसाठी येणार होते, तशी माहिती आमदार नारायण पाटील यांनी दिली होती.

करमाळ्यानंतर पवार हे बार्शी आणि पुढे मराठवाड्यातही पाहणी दौरा करणार होते. मात्र, त्यांना कफ झाल्यामुळे त्यांना तातडीने पुण्यातील रुबी हॉल क्लिनीकमध्ये ॲडमिट करण्यात आले आहे. त्याबाबतची माहिती सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

बाबांना कफचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना पुण्यातील 'रुबी हॉल क्लिनिक'मध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्या वैद्यकीय चाचण्या सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

शरद पवार हे रविवारी (ता. ०२ नोव्हेंबर) माढा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळी करमाळ्याचे आमदार नारायण पाटील त्यांच्यासोबत नव्हते. ते करमाळ्यातील पवार यांच्या दौऱ्याची तयारी करत होते. तत्पूर्वी आमदार पाटील यांनी गोविंद बागेत जाऊन पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर पवार हे माढ्याच्या दौऱ्यावर आले होते, तर आमदार पाटील हे पवारांच्या दौऱ्याची तयारी करण्यासाठी करमाळ्याला गेले होते.

कफचा त्रास जाणवू लागल्यामुळे पवार यांना रुबी हॉलमध्ये ॲडमिट करण्यात आले आहे, त्यामुळे त्यांचा आजचा करमाळ्याचा दुष्काळी दौरा रद्द झाला आहे. दिवाळीनंतर किंवा त्याअगोदर त्यांचा दौरा होईल, असे पाटील यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT