Satara Dcc Bank Chairman : सातारा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाबाबत शिवेंद्रराजेंचे मोठे विधान : ‘अध्यक्षपद किती वर्षांसाठी द्यायचं हे...’

Shivendraraje Bhosale Statement : शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर जावळीच्या स्वाभिमानाच्या मुद्द्यावरून टीका केली. सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ एकत्रित चर्चेतून ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Shivendraraje Bhosale
Shivendraraje BhosaleSarkarnama
Published on: 
Updated on: 

Satara, 02 November : ‘जावळीचा स्वाभिमान कोणीही दुखावत नाही. काहीजण तालुका सोडून गेले असून, आता परत यायचे असल्याने गोंडस बोलून लोकांपुढे येत आहेत,’ अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाबाबतही प्राथमिक चर्चा झाली असून, किती वर्षांसाठी अध्यक्षपद द्यायचे, हे एकत्र बसून ठरविण्यात येईल, असेही शिवेंद्रराजेंनी स्पष्ट केले.

‘कोणाला मतदान केले, तर जावळीचा स्वाभिमान जागा राहील, या वक्तव्याला काहीही अर्थ नाही. जावळीचा स्वाभिमान सर्वांचाच आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. मेढा येथील मतदान केंद्राला भेट दिल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘सहकारात ज्याच्याकडे बहुमत असते, तोच निवडून येतो. जावळीत आमच्याकडे सर्वाधिक मते असल्याने आम्ही मतदानासाठी आलो आहोत. आमचे ३७ ठराव असून, सदाभाऊंनी आम्हाला मतदान केले आहे. अधिकचे ठराव महायुतीकडे असल्याने परवाच्या निकालातून चित्र स्पष्ट होईल.

जिल्हा परिषदेत झालेला संघर्ष जिल्हा बँकेत होऊ नये, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची अपेक्षा होती. त्यानुसार माझ्यावर आणि आमदार धैर्यशील कदम यांच्यावर जागावाटपाची जबाबदारी देण्यात आली होती. अतुल भोसले यांच्या उपस्थितीत चर्चा करून साताऱ्याची (आमची) एक जागा कमी घेत जागावाटपाचा समतोल राखला, असे शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जिल्हा बँकेत सातारा, जावळी म्हणून दोन जागा मिळणे अपेक्षित होते. पण पॅनेल होताना पाच जागामध्ये निर्णय झाला. दोन जागा अतुल भोसले व उदयनराजे यांना होत्या. उर्वरित तीन जागा मंत्री जयकुमार गोरे व इतर जणांना दिल्या. यातून मार्ग निघावा; म्हणून जागा वाटप झाले.

Shivendraraje Bhosale
Sangli Dcc Bank : सांगली DCC बॅंकेच्या मतदानादरम्यान जतमध्ये गोंधळ : दाखवून मतदान केले, फेरमतदानाची काँग्रेस नेत्यांची मागणी; पडळकारांनीही दिले उत्तर...

जिल्हा बँकेत तज्ज्ञ संचालक

जिल्हा बँकेत तज्ज्ञ संचालक म्हणून दोन जागा सातारा विधानसभेला देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे जावळीला एक जागा नक्की मिळेल, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.

Shivendraraje Bhosale
Satara DCC Bank Election : ' सातारा जिल्हा बँकेवर महायुतीचीच सत्ता', शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून विजयाचा विश्वास

काहींच्या अपेक्षा वाढल्या होत्या; पण... : उदयनराजे

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काही लोकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. पण, महायुतीत एकजूट असल्याने सर्वकाही व्यवस्थित होईल. जिल्हा परिषदेच्या वादाचा आणि जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचा प्रश्न नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रत्येकाला अपेक्षा राहणार आहे. पण, महायुती म्हणून काही फरक पडणार नाही महायुतीचे उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येतील, असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.