Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar Drought Tour : पाण्यासाठी गाव विकायला काढलेल्या तुळशीसाठी शरद पवारांची थेट मदत; 50 लाखांचा धनादेश सुपूर्त....

Solapur News : पाण्यासाठी गाव विकायला काढलेल्या तुळशी गावाला शरद पवार यांनी 50 लाखांची मदत जाहीर केली. धनादेश खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 01 November : पाण्यासाठी गाव विकायला काढलेल्या तुळशी गावासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याबाबतचा धनादेश पवार यांनी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे सुपूर्त केला आहे. पवारांनी तुळशी गावाला आश्वासन न देता थेट ५० लाखांची मदत जाहीर केल्याने गावातून समाधान व्यक्त होत आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यावर होते. माढा तालुक्यातील वरवडे येथून त्यांनी दुष्काळी पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. दुपारी त्यांनी तुळशी येथे पिकांची, पाण्याअभावी जळू लागलेल्या फळबागांची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना पवार यांनी तुळशी गावाला थेट मदत जाहीर केली आहे.

शरद पवार हे उद्या मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत. ते तीन दिवस राज्यातील दुष्काळी गावांना भेटी देऊन तेथील पाहणी करणार आहे. त्याची सुरुवात सोलापूरमधून करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पाण्यासाठी तुळशी गाव विकायला काढले, असे आंदोलन करण्यात आले होते. त्या तुळशी गावाची पवारांनी पाहणीसाठी निवड केली होती.

तुळशी गावाची पाहणी केल्यानंतर पवारांनी पाण्याची परिस्थित जाणून घेतली. त्यावेळी गावकरी आणि आमदार अभिजीत पाटील यांनी येथील पाण्याची सद्यस्थिती पवारांना सांगितली. त्यावेळी त्यांनी तुळशी गावासाठी 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली. या रकमेचा धनादेश खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. हा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्याची सूचना त्यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 16 नोव्हेंबर रोजी बारामतीमध्ये येणार आहेत, त्यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे हे आमच्या पक्षाकडून राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडतील, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

पवार म्हणाले, मी राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा पाहणी दौरा करत आहे. हा दौरा झाल्यानंतर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. शक्य झालं तर पंतप्रधानांनाही भेटून दुष्काळाची माहिती त्यांच्यापुढे सादर करणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT