Sangli Dcc Bank : सांगली DCC बॅंकेच्या मतदानादरम्यान जतमध्ये गोंधळ : दाखवून मतदान केले, फेरमतदानाची काँग्रेस नेत्यांची मागणी; पडळकारांनीही दिले उत्तर...

Vikram sawant-Gopichand padalkar-vinod pawar News : सांगली जिल्हा बँक निवडणुकीत जत येथे मतदानादरम्यान गोंधळ झाल्याचा आरोप काँग्रेसने केला. मतदारांवरील दबाव आणि मतपत्रिकांबाबत आक्षेप घेत फेरमतदानाची मागणी करण्यात आली.
Vikram sawant-Gopichand padalkar-vinod pawar
Vikram sawant-Gopichand padalkar-vinod pawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Sangli, 01 November : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या २१ पैकी १५ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरीत सहा जागांसाठी आज (ता. ०१ नोव्हेंबर) मतदान होत आहे. मात्र, जत तालुक्यात मतदानादरम्यान मोठा गोंधळ झाला. जतमध्ये लोकशाहीला धरून झालेली नाही. मतदारांवर दबाव टाकून मतदान झाले असून कवठे महांकाळ केंद्रावरील दोन मतपत्रिका जतमध्ये कशा आढळून आल्या, असा सवाल काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांनी केला आहे. काँग्रेसचे उमेदवार विनोद पवार यांनीही मतदान दाखवून करण्यात आल्याचा आक्षेप नोंदविला असून जतमध्ये फेरमतदान घेण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावत कवठे महांकळ गटाच्या मतपत्रिका जतमध्ये कशा आल्या, असा सवाल करत या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

माजी आमदार विक्रम सावंत म्हणाले, सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसाठी आज सकाळपासून मतदान झालं. मतदान लोकशाही पद्धतीने होणं अपेक्षित असताना प्रशासनाच्या माध्यमातून ते झालेले नाही. कारण अ गटातील (सोसायटी मतदारसंघ) अनेक मतदारांनी दाखवून मतदान केलं आहे. त्याची आम्ही संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार करणार आहोत. मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सर्वकाही दिसून येईल. त्यानुसार संबंधितांवर कारवाई व्हावी. किंबहुना ही मतदान प्रक्रिया पुन्हा नव्याने घेण्यात यावी.

सांगली जिल्हा बॅंकेच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारी अर्जावर आम्ही आक्षेप नोंदविला होता. ते प्रकरण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं. त्या ठिकाणी त्यांचा अर्ज ग्राह्य धरण्यात आला, असेही सावंत यांनी नमूद केले.

ते म्हणाले, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोध करण्याची सूचना जिल्ह्यातील नेत्यांना केली होती. त्यानुसार २१ पैकी १५ जागा बिनविरोध झाल्या आहेत. फक्त जतसाठी ही निवडणूक लादली गेली आहे, असे आम्हाला वाटतं.

Vikram sawant-Gopichand padalkar-vinod pawar
Karad Politic's : ॲड उदयसिंह उंडाळकर अन्‌ धनाजी पाटलांचे जोरदार शक्तिप्रदर्शन; उंडाळकर गटाचे मतदान सहलीवरून थेट मतदान केंद्रावर दाखल

काँग्रेसचे उमेदवार विनोद पवार म्हणाले, जतमध्ये सोसायटी मतदारसंघात मतदानादरम्यान गोंधळ उडाला. जे सुरुवातीचे ५० ते ५५ मतदार होते. त्या पैकी १० ते १५ मतं सरळ सरळ उमेदवाराला दाखवून केली आहेत. आम्ही, समोरचे उमेदवारही बसलेलो होतो. त्यांच्यासमोर सरळ सरळ दाखवून मतदान केलं आहे. इतका प्रचंड दबाव मतदारांवर टाकण्यात आलेला आहे. त्यावर आक्षेप घेण्याचा निर्णय आम्ही उद्या घेणार आहोत.

जतमधील जिल्हा बॅंकेची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात यावी. कारण गुप्त मतदान प्रक्रियेची काही पद्धतच राहिली नाही. जवळजवळ १५ ते २० मतदान इकडच्या कोपऱ्यातून, तिकडच्या कोपऱ्यातून दाखवून झालेले आहे. आमच्या जत तालुक्यातील मोठमोठ्या ज्येष्ठ नेत्यांंची इतकी मजबुरी होती की त्यांनाही दाखवून मतदान करावं लागलं, असा दावा काँग्रेसचे विनोद पवार यांनी केला आहे.

गुप्त मतदान हा मतदारांचा अधिकार

दरम्यान, विरोधकांच्या उत्तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी आम्ही संयमाची भूमिका घेतली. निवडणूक अधिकारी आणि पोलिसांनी हे प्रकरण शांततेत हाताळलं. आम्हीही तक्रार केली आहे की, दबावापोटी लोकांनी उघड मतदान करावं, अशी भूमिका विरोधी पक्षाच्या लोकांनी घेतली आहे. गुप्त मतदान हा मतदारांचा अधिकार आहे, त्यामुळे तो उघड करता येऊ नये, अशी आमची भूमिका आहे.

Vikram sawant-Gopichand padalkar-vinod pawar
Phaltan Politic's : फलटणच्या मतदान केंद्रावर कट्टर विरोधकांची जुगलबंदी : 'मतदान गंडतंय बघा’ रणजितसिंहांच्या गुगलीवर रामराजेंचा स्ट्रेट ड्राइव्ह ‘तुम्ही गंडवू शकता, ते नाही’

विरोधकांनी आता विषय सोडून द्यावा

आम्ही कोणी मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप करत नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने मतदान करा. आमचं मतदान आल्यानंतर गोंधळ झाला. पण, त्यांचे मतदार आल्यानंतर मतदान करणे, तुमचा अधिकार आहे, तुम्हाला कोणाला मत द्यायचे ते द्या, असे सांगून आमचे लोक शांत झाले. ही मतदान प्रक्रिया लोकशाही व्यवस्थेला धरून शांततेत पार पडली आहे. त्यामुळे विरोधकांनी आता तो विषय सोडून द्यावा, असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.