Devendra Fadnavis, Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar News : 'फडणवीस कर्नाटकमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचाराला गेले ही बाब चांगली नाही'

Karnataka News : कर्नाटकची निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar News : कर्नाटकची निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. या निवडणुकीत भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी गेले आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

शरद पवार आज (ता. ७) सोलापूर दौऱ्यावर होते. सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत पवार यांनी फडणवीस यांना टोला लगावला. पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस कर्नाटकमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचाराला गेले ही बाब चांगली नाही. सीमाभागातील लोकांनी खूप सोसले आहे. त्यांना जर समजले की महाराष्ट्र त्यांच्या बाजूने नाही तर त्यांना अतीव दुःख होईल.

पुढे पवार म्हणाले, कर्नाटकात काँग्रेसची (Congress) सत्ता येणार असल्याचे समजते. देशात अनेक राज्यांमध्ये बिगर भाजप (BJP) पक्षाचे सरकार असल्याची स्थिती आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काय होईल हे सध्या सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. बारसू रिफायनरीबाबतही यावेळी पवार यांनी भूमिका स्पष्ट केली.

राज्याच्या विकासाच्या कोणत्याही प्रकल्पाचे स्वागतच आहे. मात्र, स्थानिकांना विचारात घेऊन असे प्रकल्प उभे राहयला हवेत. तेथील शेती, मासेमारी या व्यवसायांचे नुकसान होता कामा नये. सरकारने पोलीस बळाचा वापर करण्यापेक्षा चर्चेतून मार्ग काढावा, असे मला वाटते. पर्यावरणासाठी घातक असे प्रकल्प असतील तर तसे प्रकल्प होऊ नयेत, असेही पवार म्हणाले.

गारपिटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मी त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो. त्यांनी पंचनामे करून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात येईल असे सांगितले. काही ठिकाणी काम सुरू झाले आहे. मात्र, आम्ही आढावा घेतला तर अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही, असे पवार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT