सांगोला (जि. सोलापूर) : शहाजीराव, सोलापुरातून हेलिकॉप्टरने येताना मी खाली पाहत होतो. मंगळवेढ्यापर्यंत काळी माती दिसत होती. तुमच्या भागात आलो, तर बंगले दिसायला लागले. पहिल्यापेक्षा चित्र बदलेले आहे आणि हे चित्र तुम्ही सर्वांनी कष्टाने आणि उत्तम शेती करून बदलेले आहे. ठीक आहे, आता डाळींबावर काही रोगाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. पण, त्यातून मार्ग काढण्यााठी प्रयत्न करावे लागतील. मी स्वतःही त्यात लक्ष देणार आहे, असा शब्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगोलेकरांना दिला. (Sharad Pawar gave this word to the people of Sangola)
सांगोल्यातील (Sangola) राष्ट्रवादीचे नेते बाबूराव गायकवाड यांचा अमृत महोत्सवानिमित्त सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमात शरद पवार (Sharad Pawar) बोलत होते. ते म्हणाले की, एकेकाळी तुमच्या तालुक्याचं नाव डाळिंबानं देशात नेलं होतं, देशाबाहरेसुद्धा गेलं होतं. हे तुम्ही करू शकता आणि हे कष्टाने केल्यामुळे माझी खात्री आहे की नवी पिढी एका वेगळ्या दिशेने जाईल आणि त्यांना एक चांगली दिशा दाखवणं, हे काम बाबूराव गायकवाड यांचा आदर्श पुढे ठेवल्यानंतर नव्या पिढीला वाटेल, त्यामुळे असं जे काम करतात, त्यांचा सन्मान करणं, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आणि त्यांना आपल्या सर्वांची साथ कायम मिळेल, अशी काळजी घेणे हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे.
अनेकदा आम्हा राजकीय नेत्यांना अशा कार्यक्रमात जावं लागतं. काही लोकांची राजकीय ताकद असते. काही गुणदोष असले तरी त्यांच्यावर चांगलंच बोलावं लागतं. पण, काही ठिकाणी गेल्यावर आपण आल्याचं समाधान मिळतं, आनंद मिळतो, त्यामुळेच मी आजच्या कार्यक्रमाला आलो आहे, अशा शब्दांत पवारांनी गायकवाडांचे कौतुक केले.
ते म्हणाले की, गायकवाड यांनी सुरुवातीला कारकून म्हणून नोकरी केली. हळूहळू ते इथपर्यंत आले आहेत. त्यांनी शिक्षणाचे महत्व जाणलं. कर्मवारी अण्णांमुळे जी शैक्षणिक दालनं उभी राहली, त्यात बाबूराव गायकवाड यांचं शिक्षण झालं. कर्मवीर अण्णांचे संस्कार गायकवाड यांच्यात रुजले, त्यामुळे संधी आल्यावर गायकवाड यांनी शैक्षणिक दालनं सुरू केली. त्यातून सांगोल्याची भरभराट होण्यास मदत झाली.
नेहमी दुष्काळ दुष्काळ म्हणता पण तुमच्या तालुक्यात एकही छपराचं घर दिसंत नाही. कारण तुम्ही कष्टाने केलेली प्रगती. माणदेशातील अनेक लोक अधिकारी आहेत. कारण संकटावर मात करण्याची क्षमता. काही लोक दिल्लीत मला भेटायला आले होते. त्यांना विचारले काय करता, तर त्यांनी आमची सर्कस असल्याचे सांगितले. त्यांनी मला सर्कस बघायला बोलावले. तिथं गेल्यावर पाहिलं तर सगळे माणदेशी लोक होते. संकटावर मात करण्यासाठी हत्तीशी, सिंहाशी खेळू पण सन्मानाने जगू, असे त्यांनी त्यावेळी मला सांगितले होते.
तामिळनाडूतील सोन्याच्या व्यवसायात माणदेशी म्हणजे दुष्काळी भागातील लोक आहेत. सन्माने जगायचं, असं त्यांचं म्हणणं असतं. सांगोला तालुक्यात दुधाचा धंदा वाढला आहे आणि ते चांगले लक्षण आहे. पूर्वी सांगोल्याला दुष्काळी कामाचा आढावा घेण्यासाठीच यावे लागायचे. गणपतराव देशमुख यांच्यासारखा कर्तृतत्वान लोकप्रतिनिधी तुम्हाला लाभल्यामुळे तालुक्यात पाणी आणि इथली शेती बहरली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.