Pandharpur News : पंढरपूर राष्ट्रवादीच्या नाराज नेत्यांनी सोलापुरात येऊन घेतली पवारांची भेट; विठ्ठल परिवाराची मुंबईत लवकरच बैठक

Vitthal Parivar Leader Meet Sharad Pawar: श्री विठ्ठल कारखान्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण भगिरथ भालके, कल्याणराव काळे, गणेश पाटील आणि युवराज पाटील यांना नव्हते, त्यामुळे काळे यांच्यासह भालके आणि पाटील हे नाराज होते.
Vitthal Parivar Leader Meet Sharad Pawar
Vitthal Parivar Leader Meet Sharad PawarSarkarnama

सोलापूर : पंढरपूरच्या (Pandharpur) राजकारणाची दिशा ठरविणारा विठ्ठल परिवार एकत्र ठेवण्यासाठी खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच पुढाकार घेतला आहे. परिवारातील सर्व नेत्यांची लवकरच मुंबईत बैठक घेण्यात येईल आणि त्यात सर्व मतभेद मिटविण्यात येतील, अशी ग्वाही शरद पवार यांनी पंढरपुरातील नेत्यांना सोलापुरात दिली. (Disgruntled leaders of NCP of Pandharpur came to Solapur and meet Sharad Pawar)

श्री विठ्ठल कारखान्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण भगिरथ भालके, कल्याणराव काळे, गणेश पाटील आणि युवराज पाटील यांना नव्हते. तसेच, पुढील कार्यक्रमामुळे पवारांना काळे यांच्या कार्यालयात जाता आले नव्हते, त्यामुळे काळे यांच्यासह भालके आणि पाटील हे नाराज होते. आज सकाळी त्यांनी सोलापूर गाठत पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली आणि आपली नाराजी त्यांनी पवारांसमोर बोलून दाखवली.

Vitthal Parivar Leader Meet Sharad Pawar
Dhoble-Bhalke photo Viral : पवारांनी अभिजित पाटलांच्या उमेदवारीचे संकेत देताच ढोबळे-भालकेंचा एकत्र फोटो व्हायरल!

सोलापुरात आलेल्या पंढरपूरच्या नेत्यांना विठ्ठल परिवाराची मुंबईत लवकरच बैठक घेण्यात येईल. त्याच वेळी एकमेकांमधील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही पवारांनी काळे, भालके आणि पाटील यांना दिले. त्यामुळे आगाामी काळात विठ्ठल परिवारातील नेते राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली एकत्र येणार का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Vitthal Parivar Leader Meet Sharad Pawar
Shahajibapu On Nana Patole: काँग्रेसने कमी बुद्धीचा प्रदेशाध्यक्ष नेमलाय : शहाजीबापूंचा नाना पटोलेंवर पलटवार

सोलापुरातील शरद पवार यांच्या भेटीसंदर्भात सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे म्हणाले की, आम्ही सर्वांनी आज सकाळी सोलापुरात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, कारखान्यांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली.

विठ्ठल परिवारातील नेत्यांची आपण मुंबईत एक बैठक घेऊया. एकमेकांच्या संस्थेत कुणी हस्तक्षेप करायचा नाही, असं पवारांचं मत आलं. त्यामुळे बैठकीत हे सर्व सांगितले जाईल. कारण, ते (अभिजित पाटील) आत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले आहेत. त्यामुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या संस्थेत निवडणूक लावणं, तसेच समोरासमोर जाणं, हे काय बरेाबर दिसणार नाही. त्यामुळे शरद पवार स्वतःच म्हणाले की, आपण एक बैठक घेऊया आणि त्यातून आपण मार्ग काढूया. मी त्यांच्याशी बोलतो, असेही ते म्हणाले.

Vitthal Parivar Leader Meet Sharad Pawar
Shahajibapu Patil Emotional: शरद पवारांविषयी बोलताना शहाजीबापू झाले भावूक : ‘साहेबांचं आज दहा वर्षांनंतर....’

मुंबईतील बैठकीला भगिरथ भालके, युवराज पाटील, गणेश पाटील आणि मला बोलवणार आहेत, तसेच अभिजित पाटील यांनाही निरोप देतो, असे पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांनाही बैठकीला बोलवतील, अशी अपेक्षा आहे, असेही कल्याणराव काळे यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com