Supriya Sule, Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar : घरोघरी जाणार शरद पवार गट; 'मी महाराष्ट्रवादी' अभियान कराड उत्तरमधून सुरू करणार

Political News : मतदारांच्या घरापर्यंत पोहचण्यासाठी वेगवेगळी अभियान राबवली जात आहेत.

Vishal Patil

NCP Political News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाने तयारी सुरु केली आहे. त्याचा एक भाग म्हणून मतदारांच्या घरापर्यंत पोहचण्यासाठी वेगवेगळी अभियान राबवली जात आहेत. निवडणूक जवळ आल्याने आता शरद पवार गट आक्रमक झाला असून घरोघरी जाऊन अभियान राबवले जाणार आहे.

येत्या काळात शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या राष्ट्रवादीकडूनही 'मी महाराष्ट्रवादी' अभियान राबविण्यास सुरूवात झाली असून साताऱ्यातील कराड-उत्तर मतदारसंघात गुरूवारी यशवंतनगर येथून सुरु करण्यात आले. माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

या अभियानात शरद पवार यांनी केलेली सामाजिक कामे तसेच पक्षाकडून समाजहिताची केलेली कामे घरोघरी जावून सांगितली जाणार आहेत. राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टी व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यावतीने 'मी महाराष्ट्रवादी' या संकल्पनेची सुरुवात यशवंतनगर येथे आयोजित केला आहे.

या समारंभास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष सुनील माने, कराड-उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील, माजी शिक्षण व अर्थ सभापती मानसिंगराव जगदाळे, राज्यलेखा समितीचे माजी अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरचिटणीस संगीता साळुंखे, यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) व महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या सुचनेनुसार कराड-उत्तर विधानसभा मतदार संघातील मर्यादीत २१ गावांमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करुन जनजागृती सह 'घरोघरी राष्ट्रवादी अभियान' राबविण्यात येणार आहे. तर उर्वरीत सर्व गावांना अग्रक्रमानुसार वेगवेगळ्या तारखांवर कार्यक्रम विभागवार आयोजित करुन जनजागृती केली जाणार आहे. 

केंद्राकडून सुसंस्कृत महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम

महाराष्ट्रात दोन राजकीय पक्षात फूट पाडून केंद्रातील भाजप सरकार चुकीच्या पध्दतीने राजकारण करत आहे. सर्वसामान्य, शेतकरी यांचे प्रश्न घेवून राष्ट्रवादी (शरद पवार गट) आता लोकांच्या घरोघरी पोहचणार आहे. पक्षाने केलेल्या विकासकामांची आणि शरद पवार यांच्या सामाजिक कार्याची लोकांना माहिती सांगितली जाणार आहेत.

राज्यातील राजकीय स्थिती बिघडविण्याचे काम केंद्र सरकारकडून सुरू असून सुसंस्कृत महाराष्ट्राला बदनाम केले जात आहे. दोन मराठी माणसांचे पक्ष फोडून राजकारण केले जात आहे. तरी जनेतेने राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवार यांच्या पाठीमागे उभे रहावे, असे आवाहन या अभियानातून करण्यात येणार आहे.  

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी काॅलर ट्यून

उंचावून माना, फुगवून छाती. चहूं दिशांची पाहून प्रगती, इथेच स्वप्ने डोळ्यापुढती चित्र उद्याचे रंगविले. हे भविष्य माझ्या हाती, मी प्रचंड आशावादी. मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी.

खालील 21 गावात अभियान राबवले जाणार

उंब्रज, हजारमाची, मसूर, पाल, कोपर्डे हवेली, आदर्शनगर, उत्तर कोपर्डे, चरेगांव, पुसेसावळी, म्हासुर्णे, वडगांव (ज.स्वा.), वाठार (कि.), आर्वी, साप, तारगांव, पिंपरी (कोरेगांव), नागठाणे, अतित, जांभगांव, काशिळ, पाडळी (निनाम) इत्यादि गावांत अभियान पहिल्या टप्प्यात राबविण्यात येणार आहे.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT