मंगळवेढा (जि. सोलापूर) : पंढरपूर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भगिरथ भालके (Bhagirath Bhalke ) यांच्याकडे काय पर्याय असणार, याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी सोडून गेलेले माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे आणि भालके यांचा एका लग्नसमारंभातील फोटो व्हायरल केला जात आहे. त्यामुळे भविष्यात पंढरपूरचे राजकारण आणखी रंगतदार होणार, हे निश्चित. (Sharad Pawar indicated Abhijeet Patil's candidacy, photo of Dhoble-Bhalke together went viral)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून लक्ष्मण ढोबळे (Laxman Dhoble) हे पवारांशी जवळीक राखून होते. राष्ट्रवादीचा पहिला आमदार होण्याचा मानही त्यांना मिळाला होता; परंतु २००४ ते २००९ या काळात विश्रांती घेत २००९ पासून पुन्हा मोहोळमधून राष्ट्रवादीचे आमदार होण्याची किमया ढोबळे यांना शरद पवारांमुळे (Sharad Pawar) साधता आली होती. मात्र राष्ट्रवादीने २०१४ मध्ये डावलल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेत अपक्ष लढण्याची भूमिका घेतली, त्यात त्यांचा पराभव झाला.
त्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ढोबळेंनी भाजपशी जवळीक साधली. त्यानंतर २०२१ च्या पोटनिवडणुकीत ढोबळे यांच्या शाहू परिवाराने भाजपला कौल दिला. त्यानंतर ढोबळे परिवाराची सूत्रे बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड कोमल ढोबळे यांच्या हातात गेली. त्यांची भूमिका कायम बदलत असते. माजी मंत्री ढोबळे यांच्या प्रयत्नांमुळे मंगळवेढ्यात अनेक विकास कामे झाली. लोकप्रतिनिधी हा कामाचा असावा, तो दिखावा करणारा नसावा. चांगल्या विचाराची अॅलर्जी असणाऱ्यांकडून विकासाची काय अपेक्षा करावयाची, अशा शब्दांत अॅड ढोबळे यांनी विद्यमान आमदारांवर नाव न घेता प्रहार केला होता.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवाराबाबत भाष्य केल्यानंतर भगिरथ भालके यांचा नवा पर्याय काय असणार, याची चर्चा सध्या माध्यमांतून सुरू आहे. त्याचवेळी लक्ष्मण ढोबळे आणि भगीरथ भालके यांचा चर्चा करतानाचा एका विवाह सोहळ्यातील फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. शरद पवारांच्या भाषणानंतर हा फोटो व्हायरल झाल्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
ढोबळे यांना मानणाऱ्या अनेक समर्थकांनी अवताडे, भालके, परिचारक यांचे नेतृत्व स्वीकारले आहे; परंतु ढोबळे यांचे उपद्रव्य मूल्य मात्र अनेकांना माहिती आहे, त्यामुळे ढोबळे-भालके यांच्या चर्चेबद्दल अनेक अंदाज वर्तविले जात आहेत. ढोबळेंनी भालकेंना कोणता सल्ला दिला असेल, याची चर्चा आता सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.