Ajit Pawar Funeral In Baramati; Sharad Pawar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

दिवंगत अजितदादांचे होणार भव्य स्मारक, शरद पवारांनी जागा पाहिली अन् म्हणाले, दादांचे स्मारक

Sharad Pawar emotional after Visit Vidya Pratishthan : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघात निधन झाल्यानंतर त्यांच्यावर बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Aslam Shanedivan

  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले.

  • बारामती येथील विद्या प्रतिष्ठान परिसरात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

  • याच ठिकाणी अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारले जाणार असून शरद पवार यांनी स्थळाची पाहणी केली.

Pune News : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर राज्यातील शोक अद्याप कमी झालेला नाही. याचदरम्यान त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने विविध प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यातच दोन्ही राष्ट्रवादीच्या विनिलीकरणावरून देखील राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. यावरून वाद होत असतानाच पुन्हा एकदा जेष्ठ नेते शरद पवार अजितदादांच्या आठवणींनी भावूक झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी अजितदादांच्या भव्य स्मारकाची जागाही फिक्स केल्याचे समोर आले असून त्याची त्यांनी पाहणी केली. तर त्याबाबत सूचनाही संबंधितांना केल्याचे कळत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात २८ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांच्या असे आकस्मित जाण्याने फक्त बारामती नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरातून अद्यापही बाहेर पडलेला नाही. तोच राज्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विनिलीकरणाने दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येस खटके उडताना दिसत आहे. त्यामुळे विनिलीकरणाआधीच दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा दूर झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

अशातच आता जेष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर स्वत: ला सावरत मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी अजितदादांच्या आठवणी जपण्यासाठी बारामती येथील ज्या विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात अजितदादांचे अत्यंत शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामांमध्ये अंत्यसंस्कार झाले. तेथेच अजितदादांचे यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईला जाण्याआधी ते थेट विद्याप्रतिष्ठानच्या मैदानाकडे गेले प्रत्यक्ष त्या जागेची पाहणी केली आणि संबंधितांना तशा सूचना केल्या. पण यावेळी अंत्यस्थळाकडे बघताच ते भावूक झाल्याचे दिसून आले. यावेळी विद्याप्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांच्याशी संवाद साधत अजित पवार यांच्या स्मारकाबाबत चर्चा केली. तसेच दशक्रिया याबाबत बोलताना दादांचे स्मारक उभ कारावं लागतयं हेच न पटणारं असल्याचे ते म्हणाले. याच्याआधीही ज्यावेळी अजितदादांच्या निधनाची बातमी आली त्यावेळी त्यांना मोठा धक्का बसला होता. शरद पवार प्रतिक्रिया देताना प्रचंड भावुक झाले होते. त्यांचा कंठ दाटून आला होता आणि शब्द ही फुटत नसल्याचे दिसले होते. त्यानंतर आजपर्यंत ते बारामतीमध्येच होते.

दरम्यान आता अजितदादांच्या भव्य स्मारकाबाबत किरण गुजर म्हणाले की, अजितदादांनी विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलाच्या उभारणीसाठी मोठे योगदान दिले. दिवस-रात्र एक करून ते वाढवले. पण त्याच मैदानावर अजितदादांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यामुळे याच मैदानावर अजितदादांच्या आठवणी जपण्यासाठी यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी स्मारक उभे करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी शरद पवार यांनी भेट देऊन पाहणी केली, सूचना दिल्या. अजितदादांच्या जाण्याने बारामतीत मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांचे स्मारक बारामतीकरांना सदैव त्यांचे योगदानाची आठवण करून देत राहील.

FAQs :

1. अजित पवार यांचे निधन कधी झाले?
अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले.

2. अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार कुठे झाले?
बारामती येथील विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात अंत्यसंस्कार करण्यात आले.

3. अंत्यसंस्कार कोणत्या सन्मानात झाले?
अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.

4. अजित पवार यांचे स्मारक कुठे उभारले जाणार आहे?
विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारले जाणार आहे.

5. स्मारक स्थळाची पाहणी कोणी केली?
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्मारक स्थळाची पाहणी करून संबंधितांना सूचना दिल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT