Ajit Pawar Death : ‘अजितदादांनी मुलाच्या लग्नाला सुनेत्रावहिनींसह जोडीने येण्याचा शब्द दिला होता; पण नियतीने घात केला’

Baramati News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली मृत्यूमुळे राज्याला मोठा धक्का बसला आहे. बारामतीतील उद्योजक संग्राम सोरटे यांनी मगरवाडीतील शुभकार्य साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला आहे, तर अनेकांनी कार्यक्रम थांबवले आहेत.
Ajit Pawar-Sunetra Pawar
Ajit Pawar-Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

Someshwarnagar, 01 February : उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अकाली मृत्यूचा अनेका धक्का बसला आहे. त्या धक्क्यातून अजूनही अनेकजण सावरू शकलेले नाहीत. दादांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे अनेकांनी आपल्या घरातील शुभकार्य थांबवली आहेत, काहींनी ती साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला आहे. असाच निर्णय बारामती तालुक्यातील मगरवाडी येथील उद्योजक तथा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संग्राम सोरटे यांनी घेतला आहे.

बारामती तालुक्यातील मगरवाडी येथे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शोकसभेचे आयोजन केले होते. त्या सभेत अश्रूभरल्या नेत्रांनी सोमेश्वर कारखान्याचे संचालक संग्राम सोरटे यांनी अजितदादांसंदर्भातील आठवण सांगितली आणि पुन्हा एकदा उपस्थितींच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

अजितदादांमुळेच मगरवाडीसारख्या छोट्या गावचा आणि नवनाथ उद्योगसमूहाचा विकास झाला आहे. माझ्या मुलाचा आठ फेब्रुवारीला विवाहसोहळा होता. त्या लग्नसोहळ्यासाठी अजितदादांनी सुनेत्रावहिनींसह (Sunetra Pawar) जोडीने येण्याचा शब्द दिला होता. झेडपीच्या निकालामुळे मी ७ फेब्रुवारीला बारामतीतच आहे, त्यामुळे आठ तारेखला नक्की येईन, असे त्यांनी सांगितले होते. त्याची डायरीतही नोंद केली होती. पण नियतीने घात केला.

नेता गेला आणि भव्यताच संपली. आता सोहळा रद्द केला असून दोन्हीकडच्या मोजक्या लोकांच्या उपस्थितीत मुलाचे लग्न लावणार आहे. तेवढीच छोटी श्रद्धांजली, हे सांगताना सोरटे यांना हुंदका अनावर झाला होता.

Ajit Pawar-Sunetra Pawar
NCP President Controversy : राष्ट्रवादीचा अध्यक्ष पटेल नको पाटील हवा म्हणणाऱ्या राज ठाकरेंना भाजप नेत्यांनी सुनावले, 'नवनिर्माण...'

अजित पवारांसोबतच्या आठवणींनी संग्राम सोरटे भावूक झाले आणि उपस्थित सगळ्याच्यांच डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मगरवाडीतील नवनाथ उद्योगसमूहाचे अध्यक्ष संग्राम सोरटे यांचा मुलगा देवेंद्र याचा विवाह काष्टी (ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर) येथील उद्योजक रवींद्र मेरगळ यांची मुलगी सृष्टी हिच्याशी तीन महिन्यांपूर्वीच निश्चित झाला होता.

नव्या पिढीतले पहिले लग्न ८ फेब्रुवारी रोजी सोमेश्वर मंदिरासमोरील भव्य पटांगणात होणार होते. भव्य मंडपात ११ हजार खुर्च्या आणि १२ हजार ताटांचे जेवण नियोजित होते. रोषणाईसह सर्व व्यवहार झाले होते. दहा हजार पत्रिका छापल्या होत्या आणि अडीच हजार वाटल्याही होत्या. उरलेल्या पत्रिका वाटण्यासाठी संयोजक बुधवारी (ता. २८ जानेवारी) घराबाहेरही पडले होते. मात्र अजितदादांच्या अपघाताची बातमी आली आणि सगळेच थांबवण्यात आले. आज सोरटे यांनी भव्य लग्नसोहळा रद्द करून तो छोटेखानी करणार असल्याचे स्पष्ट केले.

Ajit Pawar-Sunetra Pawar
Nirmala Sitharaman budget : पाच राज्यात घोषणांचा पाऊस! तामिळनाडूपासून बंगालपर्यंत निवडणुकांसाठी पायघड्या; केंद्राची तिजोरी मतदारांसाठी खुली!

ते म्हणाले, नेत्याने मगरवाडीसारख्या छोट्या गावाला पाच-सहा वर्षांत दहा कोटींची कामे दिली. एका आमदाराला एवढा निधी नसतो. नेत्याने येण्याचा शब्द दिल्याने लग्नसोहळ्याचा उत्साह वाढला होता. आता घरगुती पद्धतीने विधी पार पाडणार आहोत. सरपंच विनिता हगवणे, माजी सरपंच अजित सोरटे, पोलिस पाटील अशोक मगर, उपसरपंच वैशाली गायकवाड, रामभाऊ शेलार आदींनीही अजितदादांच्या आठवणी जागवल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com