Maharashtra Politics : अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.16) बारामतीमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्या मागे उभे राहण्याचे आवाहन केले. आज (शनिवारी) 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमध्ये आपल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 'सामान्य माणसाशी संपर्क वाढला पाहिजे. त्याला आपण नवीन काय देऊ यावर विचार केला पाहिजे. त्यामुळे फारशा अडचणी येणार नाहीत.आपल्याला अनुकूल वातावरण आहे, ' असे म्हणत शरद पवारांनी संघर्षाच्या काळात सोबत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे अंतःकरणापासून आभार मानले.
'आता कामाला सुरुवात करा, आता थांबायची आवश्यकता नाही. लवकरच निवडणूक लागेल. कोण उमेदवार असेल तेदेखील स्पष्ट होईल. एक संच तयार करून घरोघरी जा. आपल्याला अनुकूल वातावरण आहे. प्रत्येकाला धीर आणि विश्वास देण्याचे काम तुम्ही करावे,' असेही आवाहन शरद पवारांनी (Sharad Pawar ) कार्यकर्त्यांना केले. माढा मतदारसंघातून मलादेखील तुम्ही निवडून दिले होते. माढा मतदारसंघामध्ये एकजुटीने लढलो तर अनुकूल निकाल देऊ, असेदेखील त्यांनी कार्यकर्त्यांना माढा मतदारसंघातून आलेल्या कार्यकर्त्यांना सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'पक्ष येतात, नवीन काढले जातात. मात्र, देशामध्ये असे कधीच घडले नाही, की ज्याने पक्ष स्थापन केला त्याचा पक्षच काढून घेतला. हा निर्णय कायद्याला धरून वाटत नाही. त्यामुळे आपण सुप्रीम कोर्टात गेलो आहे. त्याचा निकाल लागेल. चिन्हाची फारशी चिंता करायची नसते,' असे शरद पवार म्हणाले.
'14 निवडणुका लढलो, पाच निवडणुकांना चिन्हं वेगळी होती. बैल जोडी, गाय वासरू, चरखा, हाताचा पंजा आणि घड्याळ अशी निरनिराळी चिन्हे आपण पाहिली. एखाद्या संघटनेचे चिन्ह काढून घेतलं तर त्या संघटनेचे अस्तित्व संपेल असे कधी होत नसते,' असेदेखील शरद पवार यांनी सांगितले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.