Sharad Pawar : शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? पवारांच्या शिलेदारांनी मांडली रोखठोक भूमिका

NCP Congress Politics : शरद पवार गटाची मोदी बाग निवासस्थानी झाली महत्त्वपूर्ण बैठक
Sharad Pawar, Shashikant Pawar, Anil Deshmukh, Prashant Jagtap
Sharad Pawar, Shashikant Pawar, Anil Deshmukh, Prashant JagtapSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News :

आज सकाळपासूनच एका मोठ्या बातमीने वृत्तवाहिन्यांचा पडदा व्यापला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या बातमीने राज्यासह देशात खळबळ उडाली होती. या बातमीबाबत आता शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार अनिल देशमुख , शशिकांत शिंदे यांनी पवार गटाची भूमिका स्पष्ट केली आहे.

पुण्यातील शरद पवारांचे (Sharad Pawar) निवासस्थान असलेल्या मोदी बागेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होती. या बैठकीला पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), अमोल कोल्हे, यांच्यासह सर्व आजी-माजी आमदारांचीही उपस्थिती होती.

Sharad Pawar, Shashikant Pawar, Anil Deshmukh, Prashant Jagtap
Supriya Sule News : काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या शक्यता फेटाळल्या, सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले...

लोकसभा निवडणूक (Loksabha Election) आणि राज्यसभेची (Rajyasabha) निवडणूक तसेच राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाची बैठक महत्त्वाची मानली जात आहेत. या बैठकीतून एखादा मोठा निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ही तर 'पवार' नावाची भीती - जगताप

अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याची बातमी धडकली आणि त्यावर सत्ताधारीतील काही नेत्यांनी प्रतिक्रियाही दिल्या. याबाबत शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी ही बातमी साफ चुकीचे असल्याचे म्हटले आहे. पवार नावाची भीती वाटत असल्याने अशा बातम्या पेरल्या जात आहेत, असा पलटवार प्रशांत जगताप यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'इंडिया' आघाडीचा पुण्यात मेळावा

दरम्यान, 24 तारखेला पुण्यात 'इंडिया' आघाडीचा पहिला मेळावा होणार आहे, अशी माहिती पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. तसेच शरद पवार गट नवे नाव आणि नवे चिन्ह घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.

'असे काही होणार नाही' - देशमुख

काँग्रेसमध्ये शरद पवार गटाचे विलीनीकरण होणार नाही, असे आमदार अनिल देशमुख आणि शशिकांत शिंदे यांनीही स्पष्ट केले. आजच्या बैठकीत राज्यसभा, लोकसभा निवडणुका तसेच चिन्ह आणि मेळावा यावर चर्चा झाल्याचे दोघांनी सांगितले.

(Edited by Avinash Chandane)

Sharad Pawar, Shashikant Pawar, Anil Deshmukh, Prashant Jagtap
NCP Sharad Pawar : पवार गटाला मिळणार नवे निवडणूक चिन्ह; आयोगाकडे 'या' तीन चिन्हांचा प्रस्ताव

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com