Udayanaraje and Shashikant Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP Sharad Pawar : मोठी बातमी! शरद पवार गट पुन्हा निवडणूक आयोगाची पायरी चढणार; 'साताऱ्यातला भाजपचा विजय...'

Mayur Ratnaparkhe

Loksabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडील घवघवीत यश मिळालं आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाने तर लढवलेल्या दहा जागांपैकी आठ जागा जिंकल्या आहेत. तर, उर्वरीत दोन जागी पिपाणी चिन्हामुळे उमेदवारांचा पराभव झाला असं पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आहे. शिवाय या मुद्य्यावरून निवडणूक आयोगतही दाद मागणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मात्र खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी त्यांच्या पक्षाने आठ नाही तर नऊ जागा जिंकल्या असल्याचं म्हटलं आहे. कारण, साताऱ्यात भाजपचा उमेदवार कॉपी करून पास झाल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केला आहे. म्हणजे साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांचा विजय 'पिपाणी'मुळे झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

शरद पवार(Shard Pawar) यांच्या राष्ट्रवादी पार्टीला मिळालेलं तुतारी चिन्ह आणि पिपाणी चिन्हात मतदार गोंधळल्याचं बोललं जात आहे आणि याचाच फटका सातारामध्ये बसला असा दावा सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनीही केला आहे.

कारण, सातारा लोकसभा मतदारसंघातून पिपाणी चिन्हावर लढणाऱ्या अपक्ष उमेदवारास पडलेली एकूण मतं 37 हजार 62 एवढी आहेत, तर विजयी झालेले महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना मिळालेलं लीड(मताधिक्य) हे 32 हजार 771 एवढं आहे.

सातारा आणि दिंडोरी मतदारसंघात या पिपाणी चिन्हामुळे पवार गटाला फटका बसला, कारण पिपाणी चिन्हाचं नाव तुतारी ठेवण्यात आलं होतं, असं जयंत पाटील(Jayant Patil) यांचं म्हणणं आहे. तसेच यासंदर्भात आपण निवडणूक आयोगाकडेही दाद मागणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? -

साताऱ्यात 'पिपाणी' असे चिन्ह असलेल्या एक उमेदवाराला चांगली मते मिळाल्यानं शशिकांत शिंदेंवर पराभवाची नामुष्की ओढवली. याची सल शिंदे आणि संबंध राष्ट्रवादी फॅमिलीला आहे. 'पिपाणी'मुळे घात झाल्याचं राष्ट्रवादीला वाटू लागलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी खासदारांच्या अभिनंदन बैठकीतही जयंत पाटील यांनी 'पिपाणी'चा उल्लेख केला. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनीही साताऱ्यात भाजप(BJP) कॉपी करून पास झाल्याचा टोला लगावला.

तसेच, ''10 जागा महाराष्ट्रात लढलो 9 निवडून आल्या. 9 वी जागा म्हणजे साताऱ्यात 'पिपाणी' नसती तर तीही जागा आपली निवडून आली असती. तिथे कॉपी करून पास झाले आहेत. त्यामुळे दुर्दैव आहे, रडीचा डाव खेळलेत. शशिकांत शिंदे यांची हक्काची जागा होती. पिपाणी आणि तुरातीमध्ये जनतेचं कन्फूजन झालं. याच्याविरोधात आपण लढलं पाहिजे. विधानसभेला याचं नियोजन आपल्याला करावं लागेल. " असंही सुळे म्हणाल्या आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT