udayanraje bhosale | supriya sule
udayanraje bhosale | supriya sulesarkaranama

Supriya Sule : उदयनराजेंचा विजय 'कॉपी' करून; सुप्रिया सुळे कडाडल्या

Supriya Sule On Assemblye Election : 8 जागा आल्यात म्हणून डोक्यात हवा जाऊन देऊ नका. विधानसभा अन्...

राष्ट्रवादीतील बंडानं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर नेत्यांची अडचण झाली. या निवडणुकीत भाजपसारख्या पक्षाला तोंड देण्याकरिता पवारांकडे तगडे उमेदवार नसतील असे अंदाज बांधले गेले.

मात्र, या साऱ्या अंदाजांना बाजूला सारून पवारांनी निवडणुकीआधी बाजी पालटली आणि भाजपला हारवून लोकसभेत जातील, असे उमेदवार दिले. त्याचा परिणाम निकालात दिसून आला. 10 जागा लढविलेल्या पवारांनी 8 खासदार तुतारी चिन्हावर निवडून आणले. यात पवार आणि राष्ट्रवादीला धक्का निकाल म्हणजे साताऱ्यातील शशिकांत शिंदेंचा ( Shashikant Shinde ).

या पराभवावरून खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे. साताऱ्यात भाजप कॉपी करून उमेदवार पास झाल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केला आहे. म्हणजे साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांचा विजय 'पिपाणी'मुळे झाल्याचं त्यांनी सांगितलं.

साताऱ्यात 'पिपाणी' असे चिन्ह असलेल्या एक उमेदवाराला चांगली मते मिळाल्यानं शशिकांत शिंदेंवर पराभवाची नामुष्की ओढवली. याची सल शिंदे आणि संबंध राष्ट्रवादी फॅमिलीला आहे. 'पिपाणी'मुळे घात झाल्याचं राष्ट्रवादीला वाटू लागलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी खासदारांच्या अभिनंदन बैठकीतही जयंत पाटील यांनी 'पिपाणी'चा उल्लेख केला. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनीही साताऱ्यात भाजप कॉपी करून पास झाल्याचा टोला लगावला. म्हणजे साताऱ्यातील उदयनराजेंचा विजय पिपाणीमुळे झाल्याचं त्यांनी म्हटलं.

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

बारामतीतील विजयानंतर दौंडमध्ये सुप्रिया सुळे यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, "निकाल लागल्यानंतर मला जास्ट टेन्शन आलं आहे. कारण, दीड लाख मतांनी मी निवडून आली आहे. याचा जबाबदारी वाढली आहे. 10 जागा महाराष्ट्रात लढलो 9 निवडून आल्या. 9 वी जागा म्हणजे साताऱ्यात 'पिपाणी' नसती तर तीही जागा आपली निवडून आली असती. तिथे कॉपी करून पास झाले आहेत. त्यामुळे दुर्दैव आहे, रडीचा डाव खेळलेत."

udayanraje bhosale | supriya sule
Jayant Patil : अजितदादांचे आमदार घरवापसी करण्याच्या चर्चांवर जयंत पाटलांचं 'करेक्ट' उत्तर; म्हणाले, "माझा मोबाईल..."

"8 जागा मिळाल्या देव पावला. शशिकांत शिंदे यांची हक्काची जागा होती. पिपाणी आणि तुरातीमध्ये जनतेचं कन्फूजन झालं. याच्याविरोधात आपण लढलं पाहिजे. विधानसभेला याचं नियोजन आपल्याला करावं लागेल. 8 जागा आल्यात म्हणून डोक्यात हवा जाऊन देऊ नका. विधानसभा आणि दुष्काळाच्या कामाला लागलं पाहिजे," असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com