sanjay kaka patil | rohit patil.jpg sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rohit Patil : 'भंपक' म्हणल्यानं रोहित पाटील संतापले; संजयकाका पाटलांना घेतलं शिंगावर

Rohit Patil Vs Sanjaykaka Patil : कवठेमहांकाळ नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्षाला मारहाण केल्यानंतर वातावरण एकदम तापलं आहे. यातच संजयकाका पाटील आणि रोहित पाटील आमने-सामने आले आहेत.

Akshay Sabale

लोकसभेनंतर विधानसभेपूर्वी सांगलीतील राजकारण पुन्हा पेटलं आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष अयाज मुल्ला यांना मारहाण केल्याप्रकरणी माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यासह चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ( शरदचंद्र पवार ) रोहित पवार यांच्यावर थेट हल्लाबोल केला. त्यामुळे संतापलेल्या रोहित पाटील यांनीही संजयकाका पाटील यांना प्रत्युत्तर दिल्यानं वातावरण तापण्याची शक्यता आहे.

संजयकाका पाटील ( Sanjaykaka Patil ) म्हणाले, "माझा स्वीय सहाय्यक खंडू होवाळेला थांबवून मारहाण करण्यात आली. माझ्या स्वीय सहाय्यकाला मारहाण होत असेल, तर ही गोष्ट चांगली नाही. याबद्दल मुल्ला यांच्याकडे विचारणा करण्यास गेल्यावर अर्वाच्चपणे बोलण्यात आलं. अंगावर येण्याची आणि अरेरावीची भाषा झाली, तेव्हा माझ्यासोबत असलेल्या मुलानं मुल्ला यांना दोन कानाखाली लगावल्या."

"मात्र, भंपक माणसांना राजकारण करण्याची इच्छा होती," अशी टीका रोहित पाटील यांच्यावर करत, "आम्हीही फिर्याद दाखल करणार आहोत," असं संजयकाका पाटील यांनी म्हटलं.

फिर्याद दाखल करण्याचा इशारा दिल्यावर रोहित पाटील ( Rohit Patil ) यांनी संजयकाका पाटील यांना थेट शिंगावर घेतलं आहे. "संजयकाका पाटील यांना काय फिर्याद दाखल करायची, ते करूद्या. खोट्या पद्धतीनं गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न ते करतील," असा दावा रोहित पाटील यांनी केला.

"तालुक्यातील लोक ठरवतील, कोण भंपक आहे आणि कोण नाही... मला भंपक बोलल्यानं मी भंपक होत नाही. तालुक्यातील जनतेनं लोकसभेला दाखवून दिलं आहे. येत्या विधानसभेलाही दाखवून देतील," असं म्हणत रोहित पवार यांनी संजयकाका पाटील यांना वॉर्निंग दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT