Sanjaykaka Patil : अपरिपक्व माणूस म्हणत विशाल पाटलांच्या ‘त्या’ विधानांचा संजयकाकांनी घेतला समाचार

Vishal Patil News : जाती पातीच्या धर्माच्या आधारावर निवडणूक झाली. त्यात आम्हाला अपयश आलं. पण, आम्ही दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो आहोत, हेही माजी खासदारांनी आवर्जून स्पष्ट केलं.
Vishal Patil-Sanjaykaka Patil
Vishal Patil-Sanjaykaka PatilSarkarnama
Published on
Updated on

Sangli, 16 September : सांगलीचे नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांनी अलीकडच्या काळात केलेल्या विधानावरून भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी त्यांचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला आहे. ‘एखादा अपरिपक्व माणूस राजकीय पदावर जातो आणि तेव्हा तो असा भ्रमित होऊन फिरायला लागतो,’ अशी टीका संजय पाटील यांनी केली आहे.

सांगली जिल्ह्यातील विटा येथील कार्यक्रमात बोलताना माजी खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांनी विशाल पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, अलीकडच्या काळात राजकीय जीवनात माणसाला पद आणि प्रतिष्ठा मिळाली की माणूस बेभान होत चालला आहे. त्याला असं वाटतंय की, हे मी निर्माण केलं आहे. हे मी कौशल्याने मिळवलंय.

माझ्या हिम्मतीवर मी हे तयार केले आहे. हा जो भ्रम तयार होतोय, त्यामुळे माणसं बेताल होत आहेत. हे लोकांनी लोकांच्या कामासाठी दिलंय, याचा विसर पडत चालला आहे. त्याचे उदाहरण म्हणजे आपले नवनियुक्त खासदार.

खानापूर-आटपाडीत आल्यावर खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी माझा पाठिंबा सुहास बाबर यांना आहे आणि मी त्यांना निवडून आणणार, असं म्हटलं. आमच्या तासगाव कवठेमहांकळ तालुक्यात अजितराव घोरपडे यांनाही तेच सांगितलं.

Vishal Patil-Sanjaykaka Patil
Ranjitshinh Nimbalkar: 'शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत फडणवीस विरोधाचा नरेटिव्ह सेट केला..' निंबाळकरांचा गंभीर आरोप

पुन्हा सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं की, मी रोहित पाटील यांना आमदार करणार. म्हणजे एखादा अपरिपक्व माणूस एखाद्या राजकीय पदावर जातो, तेव्हा तो असा भ्रमित होऊन फिरायला लागतो, अशा शब्दांत संजयकाकांनी विशाल पाटलांच्या विधानाचा समाचार घेतला.

आपण भान ठेवून वागलं पाहिजे. आपण लोकांचं प्रतिनिधीत्व करतोय. हे लोकांनी दिलं आहे, याची जाणीव ठेवली पाहिजे. जाती पातीच्या धर्माच्या आधारावर निवडणूक झाली. त्यात आम्हाला अपयश आलं. पण, आम्ही दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो आहोत, हेही माजी खासदारांनी आवर्जून स्पष्ट केलं.

ते म्हणाले, लोकांनी आपल्याला काम करण्यासाठी हे राजकीय पद दिलेले आहे. हे कोणाची तरी पद होते, उद्या कोणाकडे तरी जाणार आहे. हे समजून घेऊन माणूस काम करतो, त्या वेळी त्याला दुःख होत नाही.

Vishal Patil-Sanjaykaka Patil
Narendra Patil : जरांगे पाटलांनी ‘तो’ हट्ट धरला अन्‌ ओबीसी-मराठा वाद पेटला; नरेंद्र पाटलांचा आरोप

अलीकडच्या काळातील राजकीय नेत्यांची विधानं आपण पाहिलीत. प्रत्येकजण आपापल्या परीनं समाजकारण आणि राजकारण करत असतो. मंगेशअण्णांनी सांगितलं की शेवटचा श्वास असेपर्यंत मी वैभवदादासोबत राहणार आहे. अशी एकनिष्ठ माणसं आता थोडीच राहिली आहेत. उगवत्याला नमस्कार करण्याची प्रवृत्ती बळावत चालली आहे, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com