Solapur News: माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची (Shri Vitthal Cooperative Sugar Factory) बदनामी थांबवण्यासाठी एक कोटी रुपये मागणाऱ्याला एकाला गुरुवारी रात्री खंडणी स्वीकारताना पकडले.
किरण राज घोडके असे खंडणी मागणाऱ्याचे नाव आहे. त्याच्यावर पंढरपूर शहर पोलिस ठाण्याच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात किरण राज घोडके हे गेल्या काही दिवसापासून आंदोलने करीत होते.कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी त्याने 1 कोटी रुपयांची मागणी केली होती. 10 लाख रुपये घेताना त्याला खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून पकडले.
आमदार अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची काही दिवसापूर्वी मोठ्या रकमेची ऑनलाइन फसवणूक झाली होती. याबाबत त्यांनी सध्या सुरू असलेल्या अधिवेशनातही हा मुद्दा मांडला होता. त्यानंतर आता काहीही चुक नसताना कारखान्याची बदनामी करीत खंडणीसाठी धमकावले जात असताना पोलिसांनी या किरण राज घोडके या तथाकथित कामगार नेत्यावर कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे. अभिजित पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत.
काही दिवसापूर्वी पुण्यात साखर आयुक्तालयासमोर कारखान्याचे कामगार आणि काही व्यापाऱ्यांना घेऊन घोडके याने आंदोलन केले होते. त्यानंतर आमदार अभिजीत पाटील यांचे स्वीय सहाय्यक नितीन सरडे यांनी घोडके याच्याकडे या आंदोलनाबाबत विचारणा केली.
त्यावर कारखान्याची बदनामी थांबवायची असेल तरएक कोटी रुपये द्या, अशी मागणी घोडके याने केली. आमदार अभिजीत पाटील यांनी याबाबत पंढरपूर पोलिसात तक्रार देण्यास सरडे यांना सांगितले होते, त्यानुसार सरडे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात घोडके यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
सरडे यांनी गुरुवारी रात्री घोडके यांना फोन केला. एका मोठ्या हॉटेलमध्ये ही रक्कम घेण्यासाठी बोलवले. त्यापूर्वी सरडे यांनी दहा लाख रुपयांच्या नोटा पोलीस आणि पंच यांना दाखविल्या. त्यानंतर पोलिसांनी दोन पंच यांना घेऊन या हॉटेल परिसरात सापळा रचला. रात्री साडेआठच्या दरम्यान घोडके पैसे नेण्यासाठी आला पोलिसांनी घोडके याला दहा लाखाच्या रकमेसह ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.