Dhule Cash Scam: ठाकरेंचा माजी आमदार महायुतीला पुरून उरला! एकनाथ शिंदेंच्या आमदाराचं टेन्शन वाढलं

Dhule cash recovery case, MLA Arjun Khotkar extortion: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी याबाबत स्टिंग ऑपरेशन केले. खोली बाहेर ठिय्या देत आठ ते दहा तास राज्यातील सर्व यंत्रणांना माहिती कळवली होती.
Dhule cash controversy, arjun khotkar
Dhule cash controversy, arjun khotkarSarkarnama
Published on
Updated on

Anil Gote News: विधिमंडळ अंदाज समितीचा धुळे दौरा महागात पडणार आहे. एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समितीचे अध्यक्ष, शिवसेनेचे आमदार आमदार अर्जुन खोतकर यामध्ये अडकण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात न्यायालयाने गुरुवारी कलाटणी देणारा निर्णय दिला.

विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर आणि बारा आमदारांचा धुळे दौरा नुकताच झाला होता. या दौऱ्यात खोतकर यांचे स्वीय सहाय्यक अनिल पाटील यांच्या विश्रामगृहातील कक्षात १.८४ कोटी रुपये आढळले होते. ही रक्कम आमदार खोतकर आणि समितीच्या सदस्यांना वाटण्यासाठी गोळा केली होती, असा आरोप आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी याबाबत स्टिंग ऑपरेशन केले. खोली बाहेर ठिय्या देत आठ ते दहा तास राज्यातील सर्व यंत्रणांना माहिती कळवली. पोलीस याबाबत सारवासारव आणि प्रकरण दडपण्यात व्यग्र झाली होती. पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी गेल्या दोन महिन्यात कुठलाच ठोस तपास केला नाही, असे आढळले आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली होती. प्रत्यक्षात अशी कोणतीच एसआयटी अस्तित्वात नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत पडद्यामागून सूत्रे हलवल्याचे बोलले जाते. राज्य सरकारची यंत्रणा हे प्रकरण दडपण्यात सक्रिय असल्याचा आरोप होत होता. या सगळ्यांना माजी आमदार अनिल गोटे एकटे पुरून उरले आहेत.

Dhule cash controversy, arjun khotkar
Political Horoscope: मराठी-हिंदी वादावरून राजकारण तापणार

धुळे पोलिसांनी याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. त्या विरोधात आमदार गोटे यांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. याची सुनावणी होऊन या प्रकरणात खंडणीसह अन्य गंभीर कलमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली. या आदेशामुळे पोलीस आणि सरकारी प्रशासन चांगलेच अडचणीत आले आहे.

या प्रकरणात पोलिसांनी योग्य तपास केला नाही, असा दावा गोटे यांनी केला आहे. खोतकर यांचे स्वीय सहाय्यक अनिल पाटील आणि उपजिल्हाधिकारी व अन्य अधिकारी यांनी हॉटेललात जेवण घेतले. मात्र त्याचे सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आले. अन्य सीसीटीव्ही फुटेज बाबत देखील पोलिसांनी अशीच बोटचेपी भूमिका घेतली. त्यामुळे या प्रकरणाचा तपास योग्य प्रकारे झाला नसल्याचा दावा गोटे यांनी न्यायालयात केला होता.

या प्रकरणात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार अर्जुन खोतकर आणि सबंध राज्य शासन अडचणीत आले आहे. विधीमंडळ अंदाज समिती आणि त्याचे कामकाज हा देखील चर्चेचा विषय आहे. प्रकरणात धुळे जिल्ह्यातून समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांना देण्यासाठी 15 कोटी रुपयांची खंडणी जमा केल्याचा दावा केला जात आहे.

याबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळाचे अधिकारी अनिल पाटील यांना यापूर्वीच बडतर्फ केले आहे. आता या प्रकरणाची पाळेमुळे खोदल्यावर आमदार खोतकर यांच्यापर्यंत तपास जातो का याची उत्सुकता आहे. या प्रकरणात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी शेवटपर्यंत लढा देत शासकीय यंत्रणेला झुकविण्यात यश मिळवले.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com