Sharad Pawar On Shahu Maharaj  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar On Shahu Maharaj : शाहू महाराजांना लोकसभेत पाहायला आवडेल का? शरद पवार म्हणाले...

Chetan Zadpe

Kolhapur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि राज्यससभा खासदार शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावरती होते. या वेळी त्यांनी आपल्या दौऱ्यातून वेळ काढत कोल्हापूरचे शाहू महाराज यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. शाहू महाराज आणि पवारांची ही भेट लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडल्याची चर्चा होती. मात्र, ही चर्चा आता औपचारिक होती असे सांगितले. मात्र, शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत पवार यांनी भाष्य केले. (Latest Marathi News)

शाहू महाराजांची भेट घेऊन बाहेर पडताच शरद पवार यांच्याभोवती माध्यम प्रतिनिधींनी गराडा घातला. या वेळी पवार यांना विचारण्यात आले की, "शाहू महाराज यांना लोकसभेत पाहायला आवडेल का? यावर पवार म्हणाले, "आता तुम्ही पत्रकारांनी विषय काढला आहे तर सांगतो. याबाबत निर्णय घेण्याचा मला काहीच अधिकार नाही. आमची महाविकास आघाडी आहे. त्यामध्ये काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनाही आहे. यात जागांसंबंधी निर्णय घ्यायचा असेल तर एकत्र बसून घेतो."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवार म्हणाले, "शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत मित्रपक्षांच्या सहकाऱ्यांशी आणि माझ्याही सहकाऱ्यांशी चर्चा केली नाही. मला व्यक्तिगत विचाराल तर माझ्या सहकाऱ्यांनाही या सूचनेबाबत आनंदच होईल, परंतु प्रत्यक्ष राजकारणात त्यांचा फारसा सहभाग नसतो. सामाजिक कामात त्यांचा सहभाग असतो."

शाहू महाराजांना खासदार होण्याची इच्छा -

ऑगस्ट 2023 मध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सभेच्या अध्यक्षस्थानी शाहू महाराज होते. त्यावेळी शाहू महाराज महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार आहेत अशीही चर्चा झाली होती. यावर स्वत: शाहू महाराज त्यावेळी म्हणाले होते की, उमेदवारीबाबत बातमी कुठून आली, हे मला माहिती नाही. मी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहे, असं कोण म्हणतंय. त्यांनाच माझ्या उमेदवारीबाबत विचारा. मात्र, खासदार व्हावं अशी माझी पूर्वी इच्छा होती. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) शाहू महाराज हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार असणार का, अशी चर्चा कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT