Sharad Pawar : सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारले; आता शरद पवार काय म्हणाले?

Supreme Court On ECI : नवीन चिन्हासाठी शरद पवार गट निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर सात दिवसात चिन्ह द्यावे लागणार
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव शरद पवार गटाला दिले आहे. हे नाव राज्यसभा निवडणुकीपर्यंत दिल्याचे आयोगाने म्हटले होते. याविरोधात शरद पवारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर सोमवारी सुनावणी झाली.

यावेळी आगामी सर्व निवडणुकीपर्यंत हेच नाव असावे, अशी मागणी शरद पवारांच्या वतीने करण्यात आली. तर पक्ष मिळाला असला तरी चिन्ह मिळाले नाही, याकडेही कोर्टाचे वेधले. यावर कोर्टाने निवडणूक आयोगाला (Election Commission) फटकारत महात्त्वाचा आदेश दिला. त्यामुळे शरद पवारांनी कोर्टाचे आभार मानले आहेत.

Sharad Pawar
Eknath Shinde : 'मुख्यमंत्री शिंदे औटघटकेचे राजे'; कायदे अभ्यासक सरोदे नेमके काय म्हणाले?

शरद पवार गटाच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) गटाला निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव दिले मात्र अद्यापही चिन्ह दिले नाही. तसेच आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी पक्षाला मिळालेलेच नाव कायम ठेवण्याची विनंती केली. आगामी निवडणुकांसाठी पक्षाच्या प्रसार आणि प्रचार करण्यासाठी चिन्ह हे महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे ते लवकर मिळावे, अशीही विनंतीही केली. त्यावर ज्यावेळी मागणी करतील त्यानंतर आठवड्यातच शरद पवार गटाला चिन्ह द्यावे, असे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar
Maratha Aarakshan Vishesh Adhiveshan: 'विशेष अधिवेशन' बोलावलं खरं; पण जरांगेंच्या लढ्याला यश मिळणार का?

या निर्णयामुळे शरद पवारांनी सुप्रीम कोर्टाचे (Supreme Court) आभार मानले आहेत. यावर त्यांनी ट्विट केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभदिनी, निवडणूक आयोगाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला अंतरिम दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशातील मतदारांना कमी लेखू नये असे निरीक्षण नोंदवले आणि मूळ पक्षाच्या तिकिटावर उमेदवार लढले त्याचे काय, असा प्रश्नही उपस्थित केला. हा मतदारांचा विजय असल्याचेही पवारांनी म्हटले आहे.

आम्हाला पूर्णपणे मान्यता देऊ नये, या मागणीवर जोरदार टीका करण्याव्यतिरिक्त, अशाच वादामुळे अंतिम मुद्यावरील संबंधित परिस्थितीचा उल्लेख केला आहे. मध्यंतरी आम्हाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार’ म्हणून मान्यता दिली. त्याबद्दल आणि निवडणूक आयोगाच्या आमच्या चिन्हासाठी आमच्या अर्जावर सात दिवसांत विचार करण्याचे निर्देश दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो, असे पवारांनी नमूद केले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Sharad Pawar
Politcal News : महाराष्ट्राच्या राजकारणात एकदा नव्हे तर दोनदा भूकंप घडवणारा 'नवा चाणक्य'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com