Sharad Pawar files his Rajya Sabha nomination as Rohit Patil signs as proposer, symbolizing the continued political legacy of the Pawar and RR Patil families in Maharashtra politics. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar : शरद पवारांचा रोहित पाटलांवर विश्वास; राज्यसभेच्या अर्जाला सूचक म्हणून दिलं नाव

Sharad Pawar Rajya Sabha nomination : कामानिमित्त शरद पवार हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात काही नव्या तरुणांची बैठक आयोजित केली होती. याच बैठकीत आर.आर आबांचं तडाखेबाज भाषण झालं. त्या भाषाणातून शरद पवारांना आबांमधील नेतृत्व दिसलं होतं.

Rahul Gadkar

Sangli News, 05 Mar : राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाविकास आघाडीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जासाठी आमदार रोहित पाटील यांचं नाव सूचक म्हणून होतं.

पण हा क्षण केवळ औपचारिकतेचा नव्हता, तर रोहित पाटील यांच्यासाठी पिढ्यान्‌पिढ्यांच्या राजकीय नात्यांचा भावनिक आणि ऐतिहासिक दुवा ठरला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अर्ज दाखल करताना सूचक म्हणून आमदार रोहित आर.आर. पाटील यांची निवड केली. आणि पुन्हा एकदा दोन कुटुंबांमधील नातेसंबंध दृढ झाले.

स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्यासोबत असलेले पवारांचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आजही तितक्याच विश्वासाने नव्या पिढीत पुढे जात असल्याचे या प्रसंगातून स्पष्ट झाले. महाविकास आघाडीच्या राजकारणात नव्या नेतृत्वाला संधी देण्याची ही प्रतिमात्मक पावले मानली जात असून, रोहित पाटील यांच्याकडे भविष्यातील सक्षम नेतृत्व म्हणून राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे. शिवाय सांगली जिल्ह्यात जयंत पाटील यांच्याबरोबर रोहित पाटील यांच्यावर विश्वास अधिक स्पष्ट होतो.

तेंव्हापासून आर. आर. आबा आणि कुटुंबियांवर लक्ष

कामानिमित्त शरद पवार हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात काही नव्या तरुणांची बैठक आयोजित केली होती. याच बैठकीत आबांचं तडाखेबाज भाषण झालं. त्या भाषाणाने शरद पवारांना आबांमधील नेतृत्व दिसले. पवारांनी चौकशी केली, हा कोण आहे मुलगा? त्यावेळी सांगण्यात आलं त्यांचं नाव आर. आर. पाटील. स्वतः पवार यांनी त्यांना बोलावून घेतलं त्यांच्याशी सुसंवाद केला.

त्यांच्या लक्षात आलं की यांच्यात कर्तुत्व आहे. लगेचच जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत्या, त्यांना उभं करण्याचा निर्णय झाला. नंतर विधानसभेची संधी मिळाली, तिथेही प्रभावी आमदार म्हणून त्यांनी काम केलं. दुसऱ्या निवडणुकीमध्ये सत्ता आली, ग्रामविकास खात्याचं काम त्यांच्याकडे आलं. नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. त्यांचे अनेक निर्णय महाराष्ट्राच्या जनतेला भावले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT