Sharad Pawar 
पश्चिम महाराष्ट्र

शरद पवार म्हणाले, ज्यांनी मला जातीयवादी म्हणून हिणवलं...

Sharad Pawar| NCP| Raj Thackeray| BJP | भोंगा हा काय मुद्दा असू शकत नाही

सरकारनामा ब्युरो

Sharad Pawar On Raj Thackeray

मुंबई : 'ज्यांनी मला जातीयवादी म्हणून हिणवत विनोदी वक्तव्ये केली त्यांच्या विनोदाचा मी आनंद घेतो. अशाप्रकारची वक्तव्य केल्याने लोक हसतात आणि अशा वक्तव्यांना गांभीर्याने घेत नाहीत,’ अशा शब्दांत खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे (Raj Thackeray) नाव न घेता निशाणा साधला.

साताऱ्यात भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेने सोमवारी आयोजित केलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज ठाकरे व भाजपचा समाचार घेतला.

'ज्यांना समाजात आधार नाही असे लोक काहीतरी वेगळी भूमिका घेऊन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. भोंगा हा काय मुद्दा असू शकत नाही, पण ज्यांच्याकडे बोलायला कोणताही मुद्दा नसतो ते असं काही तरी बोलत असतात, अशा वक्तव्यांना लोक गांभीर्याने घेत नाहीत,” असेही पवारांनी स्पष्ट केले

न्यायालयाच्या आदेशानंतर, ओबीसी आरक्षणाविनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्याचे विचारले असता शरद पवार म्हणाले की, मुख्यमंत्री आणि मंत्री मंडळ ओबीसी आरक्षण मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. सर्वांना मान्य असेल असा तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. यावेळी शरद पवार यांनी भाजपवरही निशाण साधला. भाजपला सत्ता आपल्या हातात ठेवण्याची अस्वस्थता आहे. त्यामुळे सकाळ, दुपार, संध्याकाळी महाविकास आघाडीवर टीका करत आसतात. जेवढे आघाडी सरकार पुढे जाईल तसतसे भाजपाचे अनेक मुद्दे मागे पडतील,असेहो शरद पवार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT