संजय राऊत मंगळवारी मोठा बॉम्बस्फोट करणार!

संजय राऊत (Sanjay Rauts) उद्या नेमका कोणता बॉम्बस्फोट करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Sanjay Raut Latest News
Sanjay Raut Latest News Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी मेधा सोमय्या (Medha Somaiya) आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर टॉयलेट घोटाळ्याचा आरोप केला आहे. संजय राऊतांच्या (Sanjay Raut) आरोपामुळे आपली बदनामी झाल्याचे सांगत मेधा सोमय्या यांनी मुलुंड येथील नवघर पोलीस ठाण्यात आज राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आता राऊत यांनी उद्या पर्यंत थांबा अशा इशारा दिला आहे. (Sanjay Rauts warning to Kirit Somaiya)

या संदर्भात राऊत यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले, उद्या पर्यंत थांबा असा इशारा देत त्यांनी 'संकल्प भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राचा' असे भाजपचे (BJP) बॅनर ट्वीट केले आहे. त्याच बरोबर हे ट्वीट त्यांनी किरीट सोमय्या, महाराष्ट्र भाजप, ईडी, पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी टॅग केले आहे.

Sanjay Raut Latest News
बच्चू कडू गुन्हा; तपास अधिकाऱ्याला न्यायालयाने बोलवून घेतले

त्यामुळे संजय राऊत उद्या नेमका कोणता बॉम्बस्फोट करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या सगळ्या नेत्यांना राऊत यांनी टॅग केल्याने खळबळ उडाली आहे. राऊत यांनी यामध्ये केंद्रीय तपाय यंत्रणा ईडीला टॅग केल्याने त्यांच्या संदर्भातील काहीतरी असणार आहे, असा दावा केला जात आहे. दरम्यान, राऊत यांनी याआधिही किरीट सोमय्या आणि ईडीवर आरोप केले होते.

Sanjay Raut Latest News
अजितदादांसमोर फुशारकी मारली.. पण उदय सामंतांसाठी अडचणीची ठरली!

राऊत यांनी सोमय्या यांच्यावर टॉयलेट घोटाळ्याबरोबरच विक्रांत घोटाळ्याचेही आरोप केले आहेत. राऊत यांनी रविवारी शिवसेनेच्या सोशल मीडिया मेळाव्यातही सोमय्या बाप बेटे जेलमध्ये जातील असे सांगितले होते. दरम्यान, आज किरीट सोमय्या यांनी नवघर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांनी तातडीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com