Sharad Pawar| Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP Unity : 'सगळं विसरून एकत्र येऊन काम केलेलं चांगलं..', दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर शरद पवारांची गुगली

Sharad Pawar Ajit Pawar NCP : पहिली ते चौथी हिंदी सक्तीची गरज नाही. या विद्यार्थ्यांना मातृभाषा शिकवण्याची गरज त्यावेळी असते. पण पाचवी पासून पुढे हिंदी येणं गरजेचं आहे. हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Rahul Gadkar

Sharad Pawar On NCP Unity : राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र येण्यावरून चर्चा होत असतात. दोन्ही पक्षातील नेते यावर सावध प्रतिक्रिया व्यक्त करतात. आज (शुक्रवार) शरद पवार हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात प्रश्न केला असता पवारांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्यावर गुगली टाकली.

ते म्हणाले, दोन्ही पक्ष एकत्र येऊन चांगलं काम केलं तर कधीही चांगलंच आहे. सगळे मतभेद विसरून चांगलं काम केलं तर वाईट वाटायचं कारण नाही. शिवसेना आणि मनसे एकत्र आले तर चांगले आहे. ते एकत्र येतील की नाही हे मला माहिती नाही. कारण हे एकत्र येण्यासाठी संजय राऊत प्रयत्न करत असल्याचेही ते मिश्किलपणे म्हणाले.

शक्तीपीठ महामार्गावरून शरद पवार म्हणाले, 'याच्याआधी जाहीर केलं की याचे फायदे आणि शेतकरी भूमिका मला समजून घ्यायची आहे. कोणत्याही प्रकल्पाला विरोध होतो. मी हा प्रश्न कसा सोडवता येईल यासाठी प्रयत्न करतो. राजू शेट्टी आणि त्यांचे सहकारी यांची भूमिका समजून घ्यायची आहे. आजच्या घडीला वित्त विभागाने काय म्हटलं हे मी पाहिलं नाही. सरकारची भूमिका देखील पाहिली पाहिजे.'

हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही

पहिली ते चौथी हिंदी सक्तीची गरज नाही. या विद्यार्थ्यांना मातृभाषा शिकवण्याची गरज त्यावेळी असते. पण पाचवी पासून पुढे हिंदी येणं गरजेचं आहे. हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. दोन्ही ठाकरेंची भूमिका वाचली. मुबंईला गेल्यावर याबाबत भेटेन. त्यांनी मोर्चात सहभागी व्हा असं म्हटलं आहे, त्यांचे भाष्य समजून घेतलं पाहिजे. तुम्ही सहभागी व्हा म्हटल्यावर होता येत असे नाही, भूमिका समजून घ्यावी लागेल. महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय असतील तर भूमिका घेतली जाईल, असे देखील त्यांनी सांगितले.

इस्त्रायलबाबची भूमिका अयोग्य

सौदी, कतार याबाबत जे अमेरिकेची जी भूमिका आहे. ती नाराजीची आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी मनमोहन सिंग यांनी कधीही इस्त्रायलबाबात राजकीय भूमिका घेतली नाही.आता ती भूमिका घेतली जातेय. ती काही योग्य नाही. त्यामुळे आखाती देशामध्ये आता बद्दल गैरसमज निर्माण होत आहे, असे देखील शरद पवार यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT