Kolhapur Sharad Pawar PC Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar : 'कोल्हापूरकर म्हणतील कोण ह्यो सुक्काळीचा..', पवारांनी 'तो' किस्सा सांगताच एकच हशा पिकला

Sharad Pawar On Kolhapur : "मला जर संधी मिळाली तर महाराष्ट्रातील काही गाव अशी आहेत की, तिथं मी जाऊ इच्छितो. मला त्याठिकाणी जायला आवडतं. त्यातील एक कोल्हापूर आहे. कोल्हापुरात हवा चांगली आहे. कोल्हापुरात पांढरा रस्सा- तांबडा रस्सा चांगला मिळतो."

Jagdish Patil

Kolhapur News, 04 Sept : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. काल त्यांच्या उपस्थितित समरजित घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आला. यानंतर बुधवारी सकाळी त्यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील विविध विषयांवर भाष्य करत सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. शिवाय महाविकास आघाडीच्या जागावाटपावरही त्यांनी यावेळी वक्तव्य केलं. मात्र, पत्रकार परिषद संपताना शरद पवारांनी असा एक किस्सा सांगितला ज्यामुळे पत्रकारांसह तिथे उपस्थित इतर नेते आणि स्वत: शरद पवारांनादेखील आपलं हसू आवरता आलं नाही.

शरद पवार (Sharad Pawar) यांचा राजकीय अनुभव दांडगा आहे. त्यांनी अनेक वर्ष राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात सक्रियपणे काम केलं आहे. त्यामुळे राज्यातील काही गावं अशी आहेत ज्याची त्यांना खडानखडा माहिती आहे. त्यापैकी एक कोल्हापूर. याच कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना पवारांनी माझ्या आवडत्या गावांपैकी एक कोल्हापूर असल्याचं सांगितलं.

शिवाय यावेळी त्यांनी कोल्हापुरकरांचा (Kolhapur) स्वभाव कसा आहे याचा एक किस्सा देखील सांगितला. पवारांना एका पत्रकाराने, "तुम्ही अनेक दिवसांनी कोल्हापुरच्या दौऱ्यावर सलग चार दिवसांसाठी आला आहात. काल एका ठिकाणी तुम्ही पक्ष प्रवेश केला, अशाच पद्धतीने इथे अनेक जागा लढवण्याची राष्ट्रवादीची काही योजना आहे का?" असा प्रश्न विचारला.

यावर उत्तर देताना पवार म्हणाले, "मला जर संधी मिळाली तर महाराष्ट्रातील काही गाव अशी आहेत की, तिथं मी जाऊ इच्छितो. मला त्याठिकाणी जायला आवडतं. त्यातील एक कोल्हापूर आहे. कोल्हापुरात हवा चांगली आहे. कोल्हापुरात पांढरा रस्सा- तांबडा रस्सा चांगला मिळतो."

कोण सुकाळ्ळीचा चालल्लाय ह्यो...

यावेळीच त्यांनी कोल्हापुरकरांचा स्वभाव कसा आहे, याबाबतचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, "काल मी एका ठिकाणी जात होतो. यावेळी पोलिसांनी तिन्ही बाजूचे रस्ते अडवले होते. मी माझ्यासहकाऱ्याला म्हटलं की, हे काही योग्य नाही, वाहनं जाऊ दिली पाहिजेत. त्यावर त्यांनी मला सांगितलं की, 'वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पोलिस हे करतात. शिवाय आता लोकांना देखील याचं कौतुक वाटतं.

त्यावर मी म्हटलं, 'कौतुक वाटतं की नाही माहिती नाही. पण मी आजपर्यंत कोल्हापुरात लहानपणापासून ऐकलोय आणि शिकलोय त्यानुसार अशा गाड्या थांबवल्या की ज्याची गाडी थांबवली आहे त्याची प्रतिक्रिया येईल, कोण सुकाळ्ळीचा चालल्लाय ह्यो" शरद पवार असं म्हणतात उपस्थितांना आपलं हसू आवरता आलं नाही त्यामुळे पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT