Maharashtra Political News: लोकसभेनंतर 'कॉन्फिडन्स' आलेल्या महाविकास आघाडीनं विधानसभेसाठी 'फिल्डिंग' लावली आहे. विधानसभेतही बहुमत मिळेल, अशी आशा महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) आणि शिवसेनेला ( ठाकरे गट ) आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर ठेऊन निवडणुकीला सामोरे जावं, असा हट्ट ठाकरे गटानं धरला आहे.
यावर मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं मौन बाळगलं आहे. पण, मुख्यमंत्रिपदाबाबत महाविकास आघाडीचा 'फॉर्म्युला' काय असेल? याचं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ( शरदचंद्र पवार ) शरद पवारसाहेबांनी दिलं आहे.
निवडणुकीनंतर संख्याबळावर नेतृत्वाबाबत निर्णय घ्यायचा असतो, असं शरद पवारसाहेबांनी ( Sharad Pawar ) स्पष्ट केलं आहे. यासाठी 1977 सालचा एक दाखल पवारसाहेबांनी दिला आहे. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
शरद पवार म्हणाले, "मुख्यमंत्रिपदाचं घोडे कुठेही अडलं नाही. निवडणुकीनंतर संख्याबळावर नेतृत्वाबाबत निर्णय घ्यायचा असतो. अजून कशाचाही पत्ता नाही. महाविकास आघाडीला बहुमत मिळेल, असं वातावरण आहे. पण, मुख्यमंत्रिपदाबाबत आताच मांडणी करण्याची आवश्यकता नाही."
"1977 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोणलाही पुढं केलं नव्हतं. जयप्रकाश नारायण यांनी जाहीर केलं की, आणीबाणीला विरोध करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं. एकत्र येत निवडणुकीला सामोरे गेले. निवडणूक झाल्यावर मोरारजी देसाई यांचं नाव जाहीर केलं. मते मागताना कधीही मोरारजी देसाई यांचं नाव घेतलं नव्हतं. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाबाबत आत्ताच नाव जाहीर करण्याची आवश्यकता नाही. जनतेचा पाठिंबा मिळाल्यानंतर स्थिर सरकार राज्यात आणि देशात देऊ," असा विश्वास शरद पवारसाहेबांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.