Sharad Pawar reached MLA Nilesh Lanka's house Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आमदार नीलेश लंके यांचे साधे घर पाहून शरद पवार झाले चकीत

आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांच्या घरी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) गेले होते.

मार्तंड बुचुडे

पारनेर ( अहमदनगर ) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोविड सेंटर सुरू करून आज तागायत हे कोविड सेंटर सुरू ठेवणारे आमदार नीलेश लंके सोशल मीडियामुळे राज्यभर प्रसिद्ध झाले आहे. त्यांची साधी राहणी. कार्यकर्त्यांत मिसळण्याची पद्धत व सर्वसामान्यात असलेली प्रतिमा यामुळे राज्यात चर्चेचा विषय ठरते. आमदार नीलेश लंके यांच्या घरी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार गेले होते. त्यांच्या हंगे येथील घरी जाऊन शरद पवार यांनी त्यांच्या आई-वडिलांशी चर्चा केली. Sharad Pawar was shocked to see the simple house of MLA Nilesh Lanke

माजी कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अचानक आमदार नीलेश लंके यांच्या घरी भेट दिली. त्यांचे लंके यांचे वडील ज्ञानदेव लंके व आई शकुंतला तसेच लंके यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या सदस्य राणी लंके यांनी त्यांचे स्वागत केले

शरद पवार आज (ता. 2) अहमदनगर येथे एका कार्यक्रमा निमित्त आले होते. ते अचानक पारनेर तालुक्यातील आमदार लंके यांच्या हंगे येथील राहत्या घरी भेट दिली. या वेळी त्यांच्या समावेत पालकमंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे, आमदार रोहित पवार उपस्थित होते. आमदार नीलेश लंके यांचे साधे घर पाहून शरद पवार चकीत झाले.

अतिशय साध्या पध्दतीने पवार यांचा सत्कार करण्यात आला लंके यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचा डंका थेट देशभर पसरला होता. तसेच त्यांची साधी राहणी व तरुणांचे आयडोल म्हणून त्यांची पक्षात एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे. पवार यांनी लंके यांच्या घरी नास्ताही केला. लंके यांचे साधे घर व आई-वडील यांची साधी राहणी पाहून तसेच त्यांनी केलेल्या सत्काराने पवार भारावून गेले. अतिशय छोट्या घरात व फ्यानच्या हवेत पवार घामाघूम झाले होते मात्र त्यांनी घरातील सर्वांची आस्थेवाईकपणे चौकशी केली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT