शरद पवार आले तरच प्रकल्पांना मान्यता : गडकरी यांनी ठेवली होती ही अट

अहमदनगर ( Ahmednagar ) जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या 4 हजार 74 कोटी रुपयांच्या रस्त्यांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadakari ) यांच्या हस्ते झाला.
Sharad Pawar & Nitin Gadakari
Sharad Pawar & Nitin GadakariSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या 4 हजार 74 कोटी रुपयांच्या रस्त्यांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार रोहित पवार, बबनराव पाचपुते, मोनिका राजळे, अरूण जगताप, संग्राम जगताप, माजी मंत्री राम शिंदे, महापौर रोहिणी शेंडगे, भाजपचे अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे आदी उपस्थित होते. Sharad Pawar said, Nitin Gadkari does not see political parties

या प्रसंगी शरद पवार म्हणाले, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे त्यांच्या मतदार संघातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामा निमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटण्यासाठी गेले होते. या वेळी त्यांनी रोहित पवार यांना शरद पवार भूमिपूजन कार्यक्रमाला आले तरच मी कामाला मंजुरी देईल अशी अट घातली होती. मी एखाद्या भूमिपूजन कार्यक्रमाला गेलो तर पुढे त्या कामाचे काय होते हे कळत नाही मात्र गडकरीनी हाती घेतलेल्या कामांचे तसे नसते म्हणून मी या कार्यक्रमाला आलो आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar & Nitin Gadakari
सहा लाखांत घरे हे देशासाठी 'रोल मॉडेल' : नितीन गडकरी

ते पुढे म्हणाले, देशाच्या सर्वांगिण विकासासाठी दळणवळण साधने महत्त्वाचे असते. वाहतुकीत रस्ते वाहतूक समाजाच्या व्यापक हितासाठी असतात. रस्ते बांधणी मंत्रालयाची जबाबदारी गडकरी यांनीही घेण्याआधी राज्यात 5 हजार रस्त्यांची कामे झाली होती. गडकरींनी कारभार हाती घेताच तो आकडा 12 हजारांवर गेला आहे.

मला वाहनातून प्रवास करायला आनंद वाटतो. कारण या प्रवासात मला वाहनातून परिसरातील समस्या, पिके, रस्ते दिसतात. त्यामुळे मी शक्यतो रस्त्यानेच प्रवास करणे पसंत करतो. रस्ते चांगले दिसले तर तेथील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास ते नितीन गडकरी यांची कृपा असल्याचे सांगतात. गडकरी हे कधीही त्यांच्याकडे काम घेऊन येणाऱ्याचा राजकीय पक्ष पाहत नाहीत, तर येणाऱ्या नेत्याची समाजविकासाची तळमळ पाहतात, असे शरद पवारांनी सांगितले.

Sharad Pawar & Nitin Gadakari
शरद पवार हे शेतकऱ्यांचे नव्हे तर, साखर सम्राट, कारखानदारांचे नेते

राज्यातील आगामी कृषी विषयक परिवर्तनांविषयी शरद पवार म्हणाले, अहमदनगर हा साखर कारखान्यांचा जिल्हा आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ आदींनी सहकारी कारखान्यांतून जिल्ह्यालाच नव्हेतर देशाला विकासाची दिशा दिली. सध्या राज्यात अतिवृष्टीमुळे हजारो एकर पीक नष्ट झाले आहे. अशा काळात शेतकरी ऊस शेतीकडे वळत आहेत. ऊस हे आर्थिक आधार देणारे पीक आहे. यंदाच्या पावसामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढली आहे. आगामी 2 वर्षे भूगर्भातील पाणी पातळीची समस्या येणार नाही. ऊस हे वर्षभरासाठी एकच पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांचा कल वाढणार आहे. हे पाहता साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीकडे वळले पाहिजे. गडकरींनी केंद्राचे धोरण इथेनॉलसाठी चांगले राहील याची काळजी घ्यावी, असे शरद पवार यांनी गडकरींना सूचना केली.

पवार पुढे म्हणाले, साखरेला मर्यादा आहेत. इथेनॉलला मर्यादा नाही. इथेनॉलबाबत हायड्रोजन गॅस हा इथेनॉल पुढचे व्हर्जन आहे. या नव्या कल्पना जगात दिसत आहेत. लोकांची मानसिकता तयार करणे यात गडकरींचा महत्त्वाचा हातभार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांनी गडकरींच्या नवीन विचारांतून प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com