Sanjay Raut - Sharad Pawar:
Sanjay Raut - Sharad Pawar:  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar On Sanjay Raut: सामना'तील टीकेला शरद पवारांचे उत्तरं; म्हणाले, हा आमच्या...

सरकारनामा ब्युरो

Sharad Pawar Comments on Sanjay Raut: पक्षात नव्या नेतृत्त्वाची फळी निर्माण कशी करायची, हे आमच्यातील प्रत्येकाला माहिती आहे. 1999 साली सत्तेत आलो तेव्हा आम्ही अनके सहकाऱ्यांना कॅबिनेट मंत्री केलं. आम्ही काय केलं त्यांना माहित नाही. आम्ही कुणाला संधी दिली, ते बाहेर जाऊन त्याची प्रसिद्धी करत नाही. मग त्यांनी सामना'त काय लिहीलं त्याला आम्ही महत्व देत नाही. तो लिहीण्याचा त्यांचा अधिकार आहे. आम्ही काय करतोय हे आम्हाला माहिती आहे आणि त्यात आम्हाला समाधान आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सामनातील टीकेला उत्तर दिलं आहे.

आज सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सामनातील टीकेलाही उत्तर दिलं आहे. आम्ही काय केलं हे त्यांना माहिती नाही. अध्यक्षपदाचा राजीनामा आणि पक्षातील घडामोडी हा आमच्या घरचा प्रश्न आहे. आमच्यात अनेक विषयावर चर्चा होत असते, वेगवेगळी मतं येत असतात. पण ते बाहेर जाऊन कधी त्याची प्रसिद्धी करत नाहीत. हा आमच्या घरातला प्रश्न आहे. आमच्यातील प्रत्येक सहकाऱ्याला ठाऊक आहे की आपला पक्ष पुढे कसा जाणार आहे. (Sharad Pawar News)

याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला आहे. भाजपमध्ये आदेशाची पद्धत आहे. भाजपचा आदेश एकनाथ शिंदे यांना मान्य करावा लागतो, अशा शब्दांत शरद पवार यांनी शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT