Ncp Leader Sharad Pawar
Ncp Leader Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शरद पवारांचा भाजपला टोला : केंद्र सरकारच्या धोरणामुळे गहू, ऊस उत्पादक अडचणीत

अमित आवारी

अहमदनगर - शेवगाव तालुक्यातील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या हस्ते करण्यात आले तसेच माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या चरित्र ग्रंथाचेही उद्घाटन ही यावेळी शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलताना शरद पवार यांनी केंद्रातील शेती व सहकार विषयक धोरणांवर टीका केली. ( Sharad Pawar's attack on BJP: Wheat and sugarcane growers in trouble due to central government's policy )

शरद पवार म्हणाले, केदारेश्वर कारखाना काढण्यासाठी बबनराव ढाकणे यांनी कष्ट केले. हा कारखाना उभा केला. या कारखान्यासाठी ते प्रयत्न करत असताना मला प्रश्न पडायचा पाथर्डीत ऊस कसा येणार? पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या पाथर्डी व शेवगाव तालुक्यांत ऊस कसा येणार? बबनराव ढाकणे यांनी ठरविले की ते त्यासाठी काहीही करण्याची क्षमता ठेवतात. कारखाना व ऊस उत्पादनासाठी त्यांनी पाण्याची व्यवस्था करून साडेसात लाख टन ऊस गाळप केले. कारखाना उभा करणारे, तो चालविणारे, शेतकरी व कामगारांना याचे श्रेय आहे.

ते पुढे म्हणाले की, साखर एके साखर म्हणायचे पूर्वीचे दिवस गेले. पूर्वी गुळाची बाजारपेठ होती. नंतर साखर कारखाने आले. प्रवरा लोणीत देशातील पहिला सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना सुरू झाला. या कारखान्याने सहकारी तत्त्वावर कारखाना चालतो. हे दाखवून दिले त्यानुसार राज्यभर सहकारी साखर कारखाने सुरू झाले. अहमदनगर जिल्हा साखर कारखानदारांचा जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला. मात्र हे साखर कारखाने पाणी मुबलक असलेल्या भागात होते. बबनराव ढाकणे यांनी दुष्काळी भागात पाण्याची टंचाई असूनही सहकारी साखर कारखाना चालवून दाखविला.

देशातील सहकारी साखर कारखानदारी सध्या वेगळ्या वळणावर आहे. देशातील सहकार धोरण याला कारणीभूत आहे. आमच्याकडे केंद्रात सत्ता होती. त्यावेळी सहकाराची समज व आत्मियता असल्याने सहकार व शेतकऱ्यांसाठीचे पोषक धोरण घेण्यात आले. आता तसे नाही. जगात गहू व साखरेची मागणी वाढली आहे. देशात गहू व साखरेचे उत्पादन जास्त असतानाही केंद्र सरकारने गहू व साखरेच्या निर्यातीवर बंदी आणली. निर्यातीतून शेतकऱ्यांना फायदा करून देता आला असता. मात्र त्यांनी साखर व गव्हाची निर्यात बंद केली. शेतकऱ्यांचा हा प्रश्न आम्ही संसदेत उचलून धरू, अशी ग्वाहीही त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.

साखर कारखान्यांनी बदलते केंद्र सरकारचे धोरण लक्षात घेता साखरेबरोबर अल्कहोल, इथेनॉल व वीज निर्मिती करावी. त्यासाठीचे धोरण आखावे असा सल्ला देत त्यांनी सांगितले की, बबनराव ढाकणे यांनी ग्रामपंचायतील सदस्य ते केंद्रीय मंत्री अशी लोकशाहीतील सर्वपदे भुषविली आहेत. त्यांच्या कष्टाचा व त्यागाचा वारसा असलेल्या प्रतापराव ढाकणे यांच्या मागे शक्ती उभी करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT